doda terror attack : जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला! डोडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  doda terror attack : जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला! डोडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद

doda terror attack : जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला! डोडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद

Jul 16, 2024 08:59 AM IST

jammu and kashmir terrorists attack: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये भीषण दहशतवादी हल्ला! डोडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद
जम्मू काश्मीरमध्ये भीषण दहशतवादी हल्ला! डोडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद

jammu and kashmir terrorists attack: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जम्मू-काश्मीरमधील गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने सुरक्षा दलांना हे दहशतवादी लक्ष्य करत आहेत. सोमवारी डोडा येथे दहशतवाद्यांशी लष्करी जवानांची चकमक सुरू असतांना यात चार जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना  त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या हल्ल्यात लष्कराचा एक अधिकारीही शहीद झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. लष्कर व सुरक्षा दलाने खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांना शोध घेण्यासाठी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. यात पाच जवान हे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला.

काश्मीर टायगर्स ही संघटना पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एक छोटा गट आहे. याच दहशतवादी संघटनेने ९ जुलै रोजी कठुआ येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि डोडा येथील स्पेशल ऑपरेशन ग्रुपने सोमवारी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर डोडा जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती होती.

त्यानुसार लष्कराचे पथक, जम्मू काश्मीर पोलिस व इतर सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. यानंतर जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तब्बल २० मिनिटे चाललेल्या या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता चारही जवानांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डोडामध्ये अजूनही दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. येथे तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नऊच्या सुमारास दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. व्हाईट नाइट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सैनिक जखमी झाल्याची माहिती दिली. गुप्तचर माहितीच्या आधारे जंगलात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल सतर्क आहेत. १४ जुलै रोजी कुपवाडा येथे नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले होते.

६ जुलै रोजी कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. लष्कराच्या ताफ्यावर हल्ला आणि हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले. ६ जुलै रोजी कुलगाममध्ये अनेक दहशतवादी मारले गेले, तर दोन जवानही शहीद झाले होते. अलीकडेच डोडा येथेही चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर