पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एंट्री! जैशसोबत हातमिळवणी करत पीएम मोदी, अमित शहा यांना शत्रू म्हटलं, भारताचं टेंशन वाढलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एंट्री! जैशसोबत हातमिळवणी करत पीएम मोदी, अमित शहा यांना शत्रू म्हटलं, भारताचं टेंशन वाढलं

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एंट्री! जैशसोबत हातमिळवणी करत पीएम मोदी, अमित शहा यांना शत्रू म्हटलं, भारताचं टेंशन वाढलं

Published Feb 07, 2025 08:34 AM IST

Hamas In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासने एंट्री घेतली आहे. यामुळे भारताचं टेंशन वाढलं आहे. हमासच्या नेत्यांनी पीएम मोदी आणि अमित शहा यांना शत्रू म्हटलं आहे.

लश्कर, जैश और हमास
लश्कर, जैश और हमास

Hamas In POK : भारताचं टेंशन वाढलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासशी हातमिळवणी केली. दोन्ही दहशतवादी संघटनेच्या नेत्यांची या ठिकाणी बैठक झाली. या बैठकींत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी शत्रू घोषित केलं. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जैशचा एक नेता काश्मीरच्या लढ्याबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच मोदी आणि शहा हे त्यांचे शत्रू असून काश्मीरसाठी ते एकत्र आले असल्याचं यावेळी दोन्ही संघटनेच्या दहशतवाद्यांनी म्हटलं आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आता हमासला जैश-ए-मोहम्मदसोबत काश्मीरमध्ये लढण्यासाठी दबाव टाकत आहे. या कार्यक्रमात जैश, लष्कर-ए-तोयबा आणि हमास यांनी एकाच व्यासपीठावर येत भारत विरोधी व्यक्तव्य केले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये जैशचे दहशतवादी व्यासपीठावर हमासच्या नेत्यांना संरक्षण देताना दिसत आहेत.

न्यूज 18 ने गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं की, जर हमास आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय होणार असल्याच कालच्या बैठकीवरून सिद्ध झालं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. हमासने आतापर्यंत प्रामुख्याने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर लक्ष केंद्रित केले होतं, परंतु दक्षिण आशियातील दहशतवादी गटांशी त्यांचा संबंध आतापर्यंत मर्यादित होता. मात्र, या घटनेनंतर यात वाढ होत असल्याचंन दिसत आहे.

या दहशतवादी संघटनांनी अनेक सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं आहे. तसेच अनेक दहशतवादी हल्ले देखील केले आहेत. त्यामुळे या दोन्ही दहशतवादी संघटना एकत्र आल्याने भारताचं टेंशन वाढलं आहे. जैश आणि लष्करसारख्या संघटनांना आश्रय आणि पाठिंबा दिल्याचा आरोप पाकिस्तानवर यापूर्वीही करण्यात आला आहे.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर