मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jagdeep Dhankhar : देशाचे १४वे उपराष्ट्रपती बनले जगदीप धनकर, राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ

Jagdeep Dhankhar : देशाचे १४वे उपराष्ट्रपती बनले जगदीप धनकर, राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 11, 2022 03:44 PM IST

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकरदेशाचे १४ वे उपराष्ट्रपती बनले आहेत. त्यांनीगुरुवार राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित एका समारंभात पद व गोपनीयतेची शपथघेतली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूयांनी त्यांना शपथ दिली.

देशाचे१४वे उपराष्ट्रपती बनले जगदीप धनकर
देशाचे१४वे उपराष्ट्रपती बनले जगदीप धनकर

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकर (Jagdeep Dhankhar) आता देशाचे १४ वे उपराष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी गुरूवारी राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित समारंभात शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (president Draupadi murmur) यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. धनकर यांनी विरोधी उमेदवार मार्गरेट अल्वा यांना ३४६ मतांनी हरवले होते. 

लोकसभा सचिवालया द्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, ७८० खासदारांपैकी ७२५ जणांनी मतदान केले होते. त्यापैकी धनकर (Jagdeep Dhankhar) यांना ५२८ मते मिळाली तर अल्वा यांनी १८२ मते मिळाली. ५० जण मतदानासाठी अनुपस्थित राहिले तर १५ मते अवैध ठरवली गेली. 

धनखर राज्यसभेचे अध्यक्षही असतील. ते व्यंकय्या नायडू यांची जागा घेतली. धनखर यांचा राजस्थानमधील झुंझुनूमध्ये झाला होता. राजकरणात येण्यापूर्वी ते वकील होते. त्यांनी १९९० मध्ये संसदीय कामकाज मंत्रायलयात राज्य मंत्री म्हणून काम केले होते. २०१९ मध्ये त्यांची नियुक्ती पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी करण्यात आली होती. मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासोबत वादामुळे धनकर नेहमी चर्चेत होते. 

आज उपराष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण करण्यापूर्वी त्यांनी राजघाट जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

WhatsApp channel