Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने ईडीने तिच्या विरोधात दाखल केलेले आर्थिक गैरव्यवहार प्रकरण रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जॅकलिनने २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला असून तिच्या विरोधात इतर चार्जशीट दाखल केल्या आहेत त्या रद्द करण्याची मागणी तिने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. याचिकेत असंही म्हटले आहे की, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकरां विषयी माहिती नव्हते.
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दाखल केलेली चार्जशिट आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिची या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आल्याचे तीनं म्हटले आहे.
एवढेच नाही तर, या आर्थिक गैरव्यवहारात तिचा सहभाग नाही, असे देखील याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत तो गुन्हा ठरत नाही. जॅकलीन विरोधात या प्रकरणात दोषारोप सादर करतांना अंमलबजावणी संचालनालयाने पक्षपाती वर्तन केल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेत म्हटले आहे की, ईडीने अभिनेत्री नोरा फतेहीला क्लीन चिट दिली आहे. तिच्या सूचनेनुसार तिच्या कुटुंबातील सदस्याला सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून बीएमडब्ल्यू कार मिळाल्याचे रेकॉर्डवर मान्य केले आहे. नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू देखील मिळाल्या आहेत. याचिकेत असेही म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालय एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सांगितल्या जात आहेत.
जॅकलीन ही मुळ आरोपी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तर आदिती सिंग यांना मूळ तक्रारदार म्हणून ठेवण्यात आले आहे. नोरा फतेही, निकिता तांबोळी, चाहत खन्ना आणि सोफिया सिंग या कलाकारांवर आरोपी करण्यात आलेले नाहीत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नोरा फतेहीच्या कुटुंबातील सदस्याला बीएमडब्ल्यू कार मिळाली होती. असे असतांना जॅकलीन विरोधात आकसापोटी कारवाई करण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
हे संपूर्ण प्रकरण एका बातमीवर आधारित असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सुकश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी मार्फत जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंगच्या तपासात चौकशीसाठी जॅकलिनही तपास यंत्रणेसमोर हजर झाली आहे. अर्जात म्हटले आहे की ती श्रीलंकेची नागरिक आहे आणि २००९ पासून भारतात राहत आहे. ती बॉलिवूडमध्ये काम करते. अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात देखील ती सहकार्य करत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
संबंधित बातम्या