मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अनोखी लवस्टोरी..! २.५ फुटाची नवरी अन् साडे ५ फूट उंचीचा नवरदेव, लग्नाची परिसरात चर्चा

अनोखी लवस्टोरी..! २.५ फुटाची नवरी अन् साडे ५ फूट उंचीचा नवरदेव, लग्नाची परिसरात चर्चा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 10, 2024 05:10 PM IST

Unique Wedding : जबलपूरमधील घानामध्ये एक अजब लग्न पाहायला मिळाले. अडीच फूट उंचीच्या मुलीचे लग्न साडे पाच फूट उंचीच्या तरुणाशी झाले.

२.५ फुटाची नवरी अन् साडे ५ फूट उंचीचा नवरदेव
२.५ फुटाची नवरी अन् साडे ५ फूट उंचीचा नवरदेव

मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये एका अनोख्या जोडप्याचा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. साडे पाच फूट उंचीच्या नवरदेवाने अडीच फूट उंची असणाऱ्या तरुणीशी लग्न केले. प्रेमात रंग-रुप, जात आणि धर्म पाहिले जात नसल्याचा प्रत्यय पुन्हा आला. 

जबलपूरमधील घानामध्ये एक अजब लग्न पाहायला मिळाले. अडीच फूट उंचीच्या मुलीचे लग्न साडे पाच फूट उंचीच्या तरुणाशी झाले. दोघे गेल्या आठ वर्षापासून एकमेकांना ओळखत होते तसेच त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्याचबरोबर दोघे एकाच गल्लीत रहात होते. सामाजिक संस्था बीएचसीएचआयचे सदस्यांनी हा विवाह घडवून आणला.

जबलपूरमधील हनुमानताल येथील शिव मंदिरात अडीच फूट उंचीच्या संध्याचा विवाह साडे पाच फूट उंचीच्या प्रभातसोबत पार पडला. या विवाह सोहळ्यात प्रभातचे कुटूंबीय सामील झाले होते मात्र संध्याच्या आईला हा विवाह मान्य नव्हता. 

संध्याने टीव्ही शोमध्ये घेतला होता सहभाग - 

प्रभात रीवामधील एका कंपनीत नोकरी करत आहे. तसेच संध्या एक चांगला डान्सर असून ती डान्सचे शो सुद्धा करते. संध्याने टीव्ही शो बूगी-बूगीमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळीही संध्या चर्चेत आली होती. संध्याची भलेही उंची कमी आहे मात्र ती कमालीची डान्सर आहे. 

विवाहासाठी घर सोडले -

संध्या आणि प्रभात दोघे जबलपूरमधील एकाच गल्लीत राहतात. संध्याने प्रभातसोबत लग्न करण्याची इच्छा आपल्या आई व भावाकडे व्यक्त केली होती. तिच्या आईने याला विरोध केला होता. संध्याचा हट्ट होता की, लग्न करेन तर केवळ प्रभात सोबतच. यामुळे तिच्या आईने तिला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर बीएचसीएचआय संस्थेने संध्याला आश्रय दिला तसेच प्रभातसोबत तिचे लग्नही लावून दिले. 

संध्या आणि प्रभात गेल्या आठ वर्षापासून एकमेकांना ओळखतात. हळू-हळू दोघांमध्ये प्रेम झाले. अडीच फूट उंचीच्या संध्याला प्रभातसोबत पाहून लोक त्यांना हसत होते. शनिवारी दोघांचा विवाह पार पडला. लग्नानंतर प्रभातने आपल्या नववधूसाठी एक खोली भाड्याने घेतली असून त्यामध्ये दोघांचा गृहप्रवेश झाला. 

IPL_Entry_Point