ITR Refund Scam: आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक, 'अशा' इमेल, मेसेजपासून सावधान!-itr refund scam income tax department warns taxpayers of fraud emails messages ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ITR Refund Scam: आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक, 'अशा' इमेल, मेसेजपासून सावधान!

ITR Refund Scam: आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक, 'अशा' इमेल, मेसेजपासून सावधान!

Aug 17, 2024 03:19 PM IST

Income Tax Department: आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक केली जात आहे. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी करदात्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत आयकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली.

आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक
आयकर परताव्याच्या नावाखाली करदात्यांची फसवणूक

Cyber Fraud: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना बनावट कॉल आणि पॉप-अप नोटिफिकेशनपासून ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ज्या करदात्यांना खोटे संदेश प्राप्त होतात त्यांनी प्रथम आयटी विभागाकडे हे सत्य आहे की नाही, याची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे एक्सवरील अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच करदात्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

करदात्यांनी कोणत्याही ईमेलला उत्तर देऊ नका किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक, बँक खात्याचा तपशील किंवा इतर कोणत्याही संवेदनशील माहितीची विनंती करणाऱ्या वेबसाइटला भेट देऊ नका. आयकर विभाग दिलेल्या ईमेल पत्त्याद्वारे करदात्यांशी संपर्क साधू शकतो, असे आयटी विभागाने एक्सवर लिहिले आहे.

'अशा' मेसेजपासून सावध 

‘आपल्याला १५०००/- रुपयांचा आयकर परतावा मंजूर करण्यात आला आहे, रक्कम लवकरच आपल्या खात्यात जमा केली जाईल, कृपया आपला खाते क्रमांक 5XXXXX6777 सत्यापित करा. जर हे योग्य नसेल तर खालील लिंकवर जाऊन आपल्या बँक खात्याची माहिती अपडेट करा’, असा फेक मेसेज करदात्यांना येत आहे. करदात्यांनी असे फसवे संदेश आणि ईमेल आयटी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर फॉरवर्ड करावेत.

फेक मेसेजची माहिती कुठे आणि कशी द्यायची?

आपण webmanager@incometax.gov.in संशयास्पद ईमेल फॉरवर्ड करू शकता. त्याची एक कॉपी ही तुम्ही incident@cert-in.org.in फॉरवर्ड करू शकता. तुम्हाला फिशिंग मेल आल्यास तो incident@cert-in.org.in फॉरवर्ड करा, असे आयकर विभागाने म्हटले आहे. आयटी विभागाने करदात्यांना आयटी विभागातील असल्याचा दावा करणाऱ्या लोकांकडून बनावट मेलमध्ये जोडलेले अटॅचमेंट उघडू नका असा इशारा दिला आहे. अशा मेलमध्ये दिलेल्या कोणत्याही लिंकवर थेट क्लिक करू नये. याशिवाय करदात्यांनी आधार, ओटीपी आणि पासवर्ड सारख्या संवेदनशील माहितीचे ही सुरक्षित आणि गुपीत ठेवली पाहिजे.

मृत व्यक्तीच्या नावाने नागरिकांची फसवणूक

सायबर गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत विविध पातळीवर जागरुकता निर्माण केली जात आहे. सध्या सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवा प्रकार सुरू केला आहे. सायबर गुन्हेगार मृत व्यक्तीचा पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर करून व्यवहार केला जात आहे. यामुळे मृत व्यक्तीच्या अधिकृत कागदपत्रांबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीला आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगू नये.

विभाग