'गुड फ्रेंड्स... #Melodi', इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोबत मोदींची केमिस्ट्री, शेअर केला फोटो
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'गुड फ्रेंड्स... #Melodi', इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोबत मोदींची केमिस्ट्री, शेअर केला फोटो

'गुड फ्रेंड्स... #Melodi', इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोबत मोदींची केमिस्ट्री, शेअर केला फोटो

Dec 02, 2023 08:01 PM IST

Melodi : पंतप्रधाननरेंद्र मोदीयांच्या सोबतइटलीच्या पंतप्रधानजॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांचीएक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जॉर्जिया मेलोनी व मोदींची सेल्फी
जॉर्जिया मेलोनी व मोदींची सेल्फी

संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये वर्ल्ड क्लायमेट एक्शन समिट (COP28) चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातील नेते दुबईत दाखल झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांची एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही सेल्फी इटलीच्या पीएम मेलोनी यांनी सीओपी २८ दरम्यान क्लिक केली होती. या फोटोमध्ये दोन्ही नेते हसत आहेत. मेलोनी यांनी ही सेल्फीआपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करताना म्हटले की, सीओपी २८ मध्ये चांगले मित्र. #मेलोडी. फोटो शेअर करताना पीएम मेलोनी यांनी हॅशटॅग मेलोडी वापरले आहे.

 

त्यापूर्वी सीओपी २८ परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांच्या फोटोशूटमध्येही पंतप्रधान मोदी व मेलोनी यांची केमिस्ट्री दिसून आली होती. दोघांची एकत्र हसताना व बोलतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यावर नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायक असते.

पंतप्रधान मोदी दुबईमध्ये आयोजित सीओपी २८ समिटमध्ये सहभागी होऊन शुक्रवार रात्री भारताला रवाना झाले. त्यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर लिहिले की,दुबई आभार. सीओपी २८ परिषद चांगली झाली.  पृथ्वीला एक चांगला ग्रह बनवण्यासाठी सर्वजण मिळून काम करू.

काय आहे COP?

COP म्हणजे कॉन्फ्रेंस ऑफ द पार्टीज याचा संबंध अशा देशांशी आहे, ज्यांनी १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल करारावर स्वाक्षरी केली होती. ही सीओपीची २८ वी परिषद होती. यामुळे याला COP28 म्हटले जात आहे. अशी आशा आहे की, COP28 मध्ये पृथ्वीच्या तापमानातील वृद्धीला १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या दीर्घकालिक उदिष्ठाला कायम ठेवले जाईल. २०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या करारात जवळपास २०० देशांमध्ये याबाबत सहमत झाले होते.

संयुक्त राष्ट्रात हवामान बदलावर लक्ष ठेवणारी संस्था Intergovernmental Panel on Climate Change (आयपीसीसी) नुसार १.५ डिग्री सेल्सिअस महत्वपूर्ण लक्ष्य आहे, ज्यामुळे हवामान बदलाच्या धोकादायक परिणामांना रोखले जाऊ शकते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर