इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यावेळी जी-७ शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहेत. या शिखर परिषदेसाठी आलेल्सया नेत्यांचे स्वागत त्या नेमस्ते करत करताना दिसत आहेत. यासंबंधित फोटो व व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये मेलोनी यांना जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्ज आणि यूरोपीय युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांना नमस्ते करताना पाहिले जाऊ शकते. अशा प्रकारचे व्हिडिओ इंटरनेट यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहेत. मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर 'नमस्ते' ट्रेंड करत आहे. त्याचबरोबर नेटीझन्स यावर कमेंट करत आहेत. त्याचबरोबर याचे व्हिडिओ व फोटो शेअर केले जात आहेत.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी गुरुवारी जी-७ शिखर परिषदेत जागतिक नेत्यांचे 'नमस्ते' करून स्वागत केले. मेलोनीच्या या हावभावाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी मेलोनीचे कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये मेलोनी जर्मन चान्सलर ओलाफ शोल्झ आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांचे पारंपारिक भारतीय अभिवादनासह स्वागत करताना दिसत आहे.
दक्षिण इटलीतील अपुलिया शहरातील बोर्गो एग्नाझिया (फासानो) येथे १३ ते १५ जून दरम्यान ५० व्या जी-७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास युद्धावर चर्चा केली जाणार आहे. विशेष म्हणजे जी-७ मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा आणि जपान यांचा समावेश आहे.
शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा उपस्थित होते. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आपल्या देशावरील रशियाच्या आक्रमणावर एक सत्र आयोजित करणार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशिराइटलीत पोहोचले.
मोदी शुक्रवारी जी-७ परिषदेत सहभागी होतील. त्यांच्यासमवेत अल्जेरिया, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, केनिया, मॉरिटानिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया आणि तुर्कस्तानचे नेतेही या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. मेलोनी यांच्यासह जागतिक नेत्यांशी ते विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते झेलेंस्कीशीही संवाद साधतील, अशी अटकळ बांधली जात आहे, परंतु अद्याप त्यास दुजोरा मिळालेला नाही.
संबंधित बातम्या