पत्नीची माफी मागितली, बँकेचे डिटेल्स दिले, मग आयटी इंजिनीअरनं घेतली १५ व्या मजल्यावरून उडी, असं घडलं काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पत्नीची माफी मागितली, बँकेचे डिटेल्स दिले, मग आयटी इंजिनीअरनं घेतली १५ व्या मजल्यावरून उडी, असं घडलं काय?

पत्नीची माफी मागितली, बँकेचे डिटेल्स दिले, मग आयटी इंजिनीअरनं घेतली १५ व्या मजल्यावरून उडी, असं घडलं काय?

Aug 28, 2024 11:41 AM IST

Noida engineer suicide : नोएडा येथील सेक्टर-७५ मध्ये असलेल्या पंचशील प्रतिष्ठा सोसायटीत १५ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून एका आयटी अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली.

पत्नीची माफी मागितली, बँकेचे डिटेल्स दिले, मग आयटी इंजिनीअरनं घेतली १५ व्या मजल्यावरून उडी, असं घडलं काय?
पत्नीची माफी मागितली, बँकेचे डिटेल्स दिले, मग आयटी इंजिनीअरनं घेतली १५ व्या मजल्यावरून उडी, असं घडलं काय?

Noida engineer suicide : नोयडा येथे मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. येथील सेक्टर-७५ येथे पंचशील प्रतिष्ठा सोसायटीच्या १५ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून एका आयटी अभियंत्याने आत्महत्या केली. पोलिसांना मृत व्यक्तीकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सेक्टर-११३ पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी, त्याने पत्नीची माफी मागीतीली तसेच त्याच्या बँकेचे तपशील देखील त्याने तीला शेअर केले. पोलिस त्याच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत.

या बाबत एसीपी शैव्य गोयल यांनी सांगितले की, ३६ वर्षीय पंकज हा पंचशील प्रतिष्ठा सोसायटीच्या टॉवर क्रमांक आठच्या फ्लॅट क्रमांक १५०८ मध्ये पत्नी व मुलासोबत राहत होता. कुंदकर पंकज याने मंगळवारी सायंकाळी ३ च्या सुमारास १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोणीतरी पडल्याचा आवाज ऐकून सोसायटीतील सुरक्षा रक्षक घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत पंकजचा मृत्यू झाला होता.

पंकज हा नोयडा सेक्टर-१२६ मध्ये असलेल्या कंपनीत आयटी इंजिनिअर होता. पोलीस सोसायटीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. पंकजने हे टोकाचे पाऊल उचललं तेव्हा पंकजची पत्नी जालंधरला गेली होती. या घटनेची माहिती पत्नीलाही देण्यात आली आहे. ती नोएडाला येण्यासाठी रवाना झाली आहे.

पत्नीला मेल करून मागितली माफी

घटनेपूर्वी पंकजने आपल्या पत्नीशी मेसेज व मेलद्वारे संवाद साधला होता. मेलमध्ये पंकजने लॅपटॉपसह पासवर्ड आणि बँकेशी संबंधित माहिती पत्नीला मेल केली. अभियंत्याने आत्महत्येसाठी पत्नीची माफीही मागितली आहे. आयटी अभियंता उंचावरून ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी सर्वत्र रक्त पसरले होते. याप्रकरणी पंकजच्या नतेवाइकांकडून अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पंकज गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. यासाठी तो षधही घेत होता. पंकज हा मूळचा पंजाबमधील जालंधरचा रहिवाशी आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर