ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले

ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले

Feb 03, 2025 07:14 AM IST

ISRO News : इस्रोने प्रक्षेपित केलेल्या १०० व्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. 'थ्रस्टर्स'ने काम करणे बंद केले आहे. त्यामुळे एनव्हीएस-०२ उपग्रह कक्षेत प्रस्थापित करण्यास अडचणी आल्या आहेत. या बाबत इस्रोने रविवारी माहिती दिली आहे.

ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले
ISRO चं टेन्शन वाढलं! १०० व्या मोहिमेला लागला मोठा धक्का; NVS-02 उपग्रहाच्या थ्रस्टरने काम करणे थांबवले (ANI - X)

ISRO News : इस्रोच्या १०० व्या रॉकेट मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी प्रक्षेपित करणाऱ्या आलेल्या उपग्रहात रविवारी तांत्रिक बिघाड झाला आहे.  भारताची नेव्हीगेशन यंत्रणा मजबूत करणारा २२५० किलो वजनाचा हा उपग्रह नेव्हिगेशन विथ इंडियन नक्षत्र अर्थात एनएव्हीआयसी मालिकेतील उपग्रहाचे थ्रस्टरने अचानक काम करणं बंद केलं आहे.  

इस्रोच्या एनव्हीएस-०२ उपग्रहाचे बुधवारी प्रक्षेपण करण्यात आले होते.  अंतराळात पाठवण्यात आलेल्या या उपग्रहाचे 'थ्रस्टर्स' काम करू न शकल्याने एनव्हीएस-०२ उपग्रह कक्षेत प्रस्थापित करण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांना मोठा  धक्का बसला आहे. इस्रोने रविवारी या घटनेची माहिती दिली आहे. एनव्हीएस-०२ या उपग्रहाला योग्य कक्षेत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यानातील थ्रस्टर्सने योग्य पद्धतीने काम करत नसल्याने यशस्वी होऊ शकला नाही, अशी माहिती इस्रोने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.  

भारताच्या स्वत:च्या अंतराळआधारित नेव्हिगेशन सिस्टीमसाठी महत्त्वाचा मानला जाणारा एनव्हीएस-०२ उपग्रह २९ जानेवारी रोजी जीएसएलव्ही-मार्क २ रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रोने असेही म्हटले आहे की, "उपग्रह प्रणाली निरोगी आहे आणि उपग्रह सध्या लंबवर्तुळाकार कक्षेत आहे. लंबवर्तुळाकार कक्षेत नेव्हिगेशनसाठी उपग्रहांच्या वापरासाठी पर्यायी मोहिमेची रणनीती आखली जात आहे. २०१३ पासून एनएव्हीआयसी सीरिजचे एकूण ११  उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले असून, त्यापैकी ६  उपग्रह पूर्णपणे किंवा अंशतः निकामी झाले आहेत.

१९९९ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या कारगिल युद्धानंतर भारताने एनएव्हीआयसी विकसित केले. युद्धादरम्यान भारताला जीपीएस डेटा नाकारण्यात आला होता आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जीपीएसची प्रादेशिक आवृत्ती तयार करण्याचे आश्वासन दिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर