ISRO ची देशाला नववर्षाची मोठी भेट; SPADEX मिशनचं यशस्वी लाँचिंग, भारत बनला जगातील चौथा देश!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ISRO ची देशाला नववर्षाची मोठी भेट; SPADEX मिशनचं यशस्वी लाँचिंग, भारत बनला जगातील चौथा देश!

ISRO ची देशाला नववर्षाची मोठी भेट; SPADEX मिशनचं यशस्वी लाँचिंग, भारत बनला जगातील चौथा देश!

Dec 30, 2024 11:40 PM IST

Isro spadex mission : इस्रोने आपली नवी मोहीम स्पेडेक्स यशस्वीरित्या प्रक्षेपित केली आहे. तत्पूर्वी, तांत्रिक कारणांमुळे या मोहिमेचे प्रक्षेपण दोन मिनिटे उशिरा नेण्यात आले होते.

स्पेडेक्स मोहीम यशस्वी
स्पेडेक्स मोहीम यशस्वी

नववर्षाच्या आधीच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्त्रोनं ऐतिहासिक कामगिरी करत देशाला नववर्षीची मोठी भेट दिली आहे. इस्त्रोने सोमवारी महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. प्रक्षेपण वाहनात २४ प्रयोग करण्यात आले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) २२०किलो वजनाच्या दोन उपग्रहांसह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. याआधी,पृथ्वीच्या वरच्या त्याच कक्षेत असलेल्या इतर उपग्रहांशी टक्कर टाळण्यासाठी प्रक्षेपण केवळ दोन मिनिटे उशीर झाला होता.

या मोहिमेचे यश अंतराळात दोन उपग्रहांच्या डॉकिंग आणि अन-डॉकिंगवर अवलंबून आहे. आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका आणि चीन यांनाच हे करता आले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही रॉकेट या नव्या मोहिमेद्वारे 'स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट'चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथून रात्री बरोबर १० वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. या मोहिमेला स्पेडेक्स (SPADEX)असे नाव देण्यात आले आहे. प्रक्षेपणानंतर इस्रोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही मोहीम भारताच्या अंतराळ मोहिमेतील मैलाचा दगड ठरेल. या मोहिमेत दोन उपग्रह एकमेकांना जोडून अंतराळात वेगळे केले जाणार आहेत.

इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेच्या यशामुळे भारताच्या आगामी मोहिमा चांद्रयान-४, स्वत:चे अंतराळ स्थानक आणि भारतीय व्यक्तीचे चंद्रावरील पाऊल यांचे स्वप्न पूर्ण होईल.

पीएसएलव्ही रॉकेट ए (एसडीएक्स 01) आणि स्पेसक्राफ्ट बी (एसडीएक्स 02) या दोन अंतराळ यानांना एका कक्षेत घेऊन जाईल जे त्यांना एकमेकांपासून पाच किमी दूर ठेवेल, असे इस्रोने म्हटले आहे. त्यानंतर इस्रोमुख्यालयातील शास्त्रज्ञ त्यांना तीन मीटरच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतील, त्यानंतर ते पृथ्वीपासून सुमारे ४७० किमी उंचीवर एकत्र विलीन होतील. या प्रक्रियेला डॉकिंग म्हणतात. यानंतर हे दोन्ही उपग्रहही वेगळे म्हणजेच अन डॉकिंग केले जातील.

खास क्लबध्ये होणार एंट्री

भारताने यापूर्वी अंतराळात असा प्रयोग केलेला नाही. त्यात इस्रोला यश आले तर ते जगातील निवडक देशांमध्ये सामील होईल. यापूर्वी केवळ अमेरिका, चीन आणि रशिया यांनाच अंतराळात ही कामगिरी करता आली आहे.

इस्रोचे रॉकेट पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) एसडीएक्स-१ आणि एसडीएक्स-२ या दोन उपग्रहांना ४७६ किमीच्या वर्तुळाकार कक्षेत स्थापित करेल आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (एसपीएडीईएक्स) प्रयत्न करेल.

भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा आणि उपग्रह सेवा मोहिमांसाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान असलेल्या ऑर्बिटल डॉकिंगमध्ये भारताची क्षमता प्रस्थापित करण्यासाठी स्पेडेक्स ही महत्त्वाकांक्षी मोहीम आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

लॉन्चिंग वेळ दोन मिनिटांनी वाढवली -

इस्रोने स्पेडेक्स मोहिमेचे प्रक्षेपण रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी नियोजित केले होते, पण प्रक्षेपण दोन मिनिटे पुढे ढकलण्यात आले. पृथ्वीच्या वरच्या त्याच कक्षेत असलेल्या इतर उपग्रहांशी टक्कर टाळण्यासाठी दोन मिनिटे उशिराने रात्री बरोबर १० वाजता हे प्रक्षेपण झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर