देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच तीन ठराव मंजूर केले.आजच्या बैठकीत इंडिया आघाडीने आगामी निवडणुकांसाठीची रणनीती तयार केली आहे. या बैठकीसाठी जमलेल्या २८ पक्षांच्या नेत्यांनी बैठक पार पडल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. लालू म्हणाले की, इस्त्रोच्या वैज्ञानिकांना आवाहन आहे की, मोदींना'चंद्रलोक'राहू दे आता'सूर्यलोक' पोहोचवले पाहिजे.
लालू प्रसाद यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशाला धोका दिला आहे. मोदी सरकारने परदेशात जमा काळे धन भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले, मात्र हे त्यांना जमलं नाही. लालू यादव म्हणाले की, माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या असूनही मी आज जिवंत आहे तसेच निवडणूक लढण्यासही तयार आहे. आम्ही सर्वजण एकत्र आलो असून एक होऊन आगामी निवडणूक लढू.
लालू यादव म्हणाले की, सध्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा खूप जयजयकार होत आहे. मी इस्त्रोच्या वैज्ञानिकांना आवाहन करतो की, त्यांनी मोदींना सूर्यलोक पोहोचवावे. सरकारवर निशाणा साधताना लालू यादव म्हणाले की, देशात इतकी गरीबी आणि बेरोजगारी असताना सरकार म्हणते की, देश विकास करत आहे. विरोधी पक्षात असा एकही नेता नाही, ज्यांच्यावर ईडी, सीबीआयने कारवाई केलेली नाही.
लालू यादव म्हणाले की, मी माझी किडनी ट्रांसप्लाट केली आहे. सिंगापूरमधील मुलीने ही किडनी दान केली आहे. माझ्यावर सात मोठे ऑपरेशन झाले तरीही मी जिवंत आहे. मला विश्वासआहे की, मी स्वस्थ राहीन आणि मोदींना हटवून शांत बसेन. याचा आम्ही संकल्प केला आहे.