ISRO Recruitment 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था जगातील मानाची अंतराळ संशोधन संस्था आहे. संस्थेत नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण या ठिकाणी नोकरी साठी अर्ज कसा करावा? येथील भरती कधी निघते या बाबत फारशी माहिती नसते. जर तुम्हाला इस्रोमध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी अर्ज कसा करावा हे माहिती नसेल तर घाबरू नका. कारण इस्रोमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
जाहिरात निघालेल्या पदांसाठी उमेदवारांना २ लाखांहून अधिक पगार मिळणार आहे. या बाबत इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून यात या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची तारीख या बाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
तब्बल १०३ पदे भरली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी एसडी, वैज्ञानिक अभियंता - एससी, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ - बी, ड्राफ्ट्समन - बी आणि सहाय्यक (राजभाषा) या पदांचा समावेश आहे.
वैद्यकीय अधिकारी (एसडी) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्ष असावे. वैद्यकीय अधिकारी (एसी) पदासाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्षे असावे. वैज्ञानिक अभियंता (एसी) पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३० वर्ष असावे. तांत्रिक सहाय्यक पदासाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्ष असावे. वैज्ञानिक सहाय्यकसाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्ष असावे. तंत्रज्ञ (बी)पदासाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्ष असावे. ड्राफ्ट्समन (बी) साठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्ष असावे. सहाय्यक (राजभाषा) साठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्ष असावे. तर एसी, एसटी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ तर ओबीसी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत३ वर्षांची सवलत आहे.
इस्रोच्या वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएसची डीग्री गरजेची आहे. तर व कामाचा किमान २ वर्ष अनुभव असावा.
वरील दांसाठी इच्छुकांना ९ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी अर्ज करटा येणार आहे. इस्रोची अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करावा लागणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या पदानुसार दरमहा २१ हजार ७०० ते २ लाख ८ हजार ७०० रुपये पगार दिला जाईल.