मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरी, वैज्ञानिकसह विविध पदांसाठी भरती; ८१ हजारांपेक्षा अधिक पगार

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरी, वैज्ञानिकसह विविध पदांसाठी भरती; ८१ हजारांपेक्षा अधिक पगार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 23, 2024 04:49 PM IST

ISRO Recruitment 2024 Post Name: इस्त्रोमध्ये वैज्ञानिकसह विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे.

jobs 2024
jobs 2024 (HT)

ISRO Recruitment 2024 Salary: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोमध्ये नोकरीत करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इस्त्रोने वैज्ञानिक पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४१ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी २२ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि नोकरीचे ठिकाण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इस्त्रोमध्ये एकूण ४१ वैज्ञानिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली. अ‍ॅग्रीकल्चर, फॉरेस्ट्री, इकोलॉजी, जिओइन्फोमॅटीक, जिओलॉजी, जिओफिजिक्स, सॉइल सायन्स, अर्बन स्टडीज या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे.

 

पात्रता

ME/M.Tech/MSc किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील समकक्ष पदवी, किंवा B.Sc/BE/B.Tech/ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील समकक्ष पदवी. पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी इस्त्रोच्या अधिक वेबसाईटला भेट द्यावी.

 

वय आणि पगार

या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८- ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्र उमेदवारांना प्रति महिना ६५ हजार ५५४- ८१ हजार ९०६ पगार मिळणार आहे.

 

अर्ज शुल्क

एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूबीडी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना ५०० रुपये, तर सामान्य/अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.

 

अर्ज कसा करायचा?

- सर्वप्रथम उमेदवारांने इस्त्रोची अधिकृत वेबसाइट https://www.isro.gov.in वर भेट द्यावी.

- त्यानंतर Careers पर्यायावर क्लिक करावे.

- Current Opportunities मध्ये Scientist/Engineer 'SC', Medical Officer 'SC', Nurse 'B' & Library Assistant 'A' लिंक करावे.

- यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करा.

- नवीन खाते उघडून लॉग इन करावे.

- त्यानंतर अर्ज करून अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा.

WhatsApp channel