ISRO RLV Pushpak landing: ISRO ने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय अंतराळ संस्थेने RLV पुष्पक यानाचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात यश मिळवले आहे. ISRO ने आज रविवारी २३ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पुन्हा वापरता येणारे लॉन्च व्हेईकल (RLV) च्या लँडिंगच्या प्रयोगात यश मिळवले आहे. यापूर्वी २२ मार्च रोजी इस्रोने या यानचे दुसरे यशस्वी लँडिंग केले होते. रविवारी पुन्हा या बाबत यश मिळवल्यावर इस्रोने सांगितले की लँडिंगसाठी अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु आव्हानात्मक परिस्थितीत जोरदार वाऱ्याच्या दरम्यान यानाचे स्वयंचलित लँडिंग करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूपासून सुमारे २२० किमी अंतरावर असलेल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लाकेरे येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे सकाळी ७.१० वाजता इस्रोकडून आरएलव्ही पुष्पक विमानाची चाचणी घेण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने हे विमान ४.५ किमी उंचीवर नेले आणि तेथून सोडण्यात आले. यानंतर हे यान स्वयंचलितरित्या धावपट्टीवर उतरण्यात आले.
इस्रोचा RLV प्रकल्प हा एक महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या यांनाद्वारे अंतराळात भारतीय अंतराळ वीरांना पाठवण्यास मदत मिळणार आहे. भारताच्या अंतराळ विषयक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे मिशन अत्यंत महत्त्वाचे आहे. RLV-LEX-03 चा उद्देश वाहनाची कार्यक्षमता, मार्गदर्शन आणि लँडिंग क्षमता सुधारणे आहे. आरएलव्ही विकसित करणाऱ्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक एस उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले की, दुसऱ्या लँडिंगच्या तुलनेत आरएलव्ही-एलईएक्स ३ अधिक आव्हानात्मक राहिले कारण त्याची चाचणी यावेळी ५०० मीटर उंचीवरुन करण्यात आली.
लँडिंगनंतर इस्रोने सांगितले की, RLV-LEX-०३ चे स्वयंचलित लँडिंग सुरू असतांना जोरदार वारे वाहू लागले होते. यामुळे ही चाचणी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आली. आरएलव्ही 'पुष्पक' वाहन भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किमी उंचीवरुन सोडण्यात आले. इस्रोने सांगितले की, “लिफ्ट-टू-ड्रॅग रेशो कमी असल्यामुळे लँडिंगचा वेग ३२० किमी प्रतितास पेक्षा जास्त होता. व्यावसायिक विमानाचा लँडिंगचा वेग ताशी २६० किमी होता. यावरून याचा अंदाज लावता येतो. तर लढाऊ विमानाचा लँडिंगचा वेग ताशी २८० च्या सुमारास होता.
संबंधित बातम्या