इस्रोची पुन्हा गगनभरारी! सेंच्युरी एनव्हीएस-०२ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारताची नेव्हिगेशन यंत्रणा होणार आणखी अचूक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रोची पुन्हा गगनभरारी! सेंच्युरी एनव्हीएस-०२ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारताची नेव्हिगेशन यंत्रणा होणार आणखी अचूक

इस्रोची पुन्हा गगनभरारी! सेंच्युरी एनव्हीएस-०२ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारताची नेव्हिगेशन यंत्रणा होणार आणखी अचूक

Jan 29, 2025 07:26 AM IST

ISRO launches NVS 02 : इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकलने (जीएसएलव्ही) स्वदेशी क्रायोजेनिक प्रक्षेपकाच्याच्या साह्याने आज पहाटे नेव्हीगेश यंत्रणा मजबूत करणारा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

इस्रोची पुन्हा गगनभरारी! सेंच्युरी एनव्हीएस-०२ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारताची नेव्हिगेशन यंत्रणा होणार आणखी अचूक
इस्रोची पुन्हा गगनभरारी! सेंच्युरी एनव्हीएस-०२ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारताची नेव्हिगेशन यंत्रणा होणार आणखी अचूक (PTI)

ISRO launches NVS 02 :  भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेने (इस्रो) आज श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून पुन्हा नवा  इतिहास रचला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपली १०० वी मोहीम अर्थात जीएसएलव्ही रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या मोहिमेतून देशाची नेव्हिगेशन यंत्रणा मजबूत करणारा  उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांच्या नेतृत्वातील ही पहिली मोहीम होती. त्यांनी १३ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकलने (जीएसएलव्ही) स्वदेशी क्रायोजेनिक प्रक्षेपकाच्या माध्यमातून  आपल्या १७ व्या उड्डाणात आज बुधवारी (दि २९) सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी येथील दुसऱ्या लाँच पॅडवरून यशस्वी उड्डाण केले.

इस्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'जीएसएलव्ही-एफ १५/एनव्हीएस-०२ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, भारताने अंतराळ नेव्हिगेशनमध्ये नवीन उंची गाठली आहे!'

हा नेव्हिगेशन उपग्रह 'नेव्हिगेशन विथ इंडियन नक्षत्र' (एनएव्हीआयसी) मालिकेतील दुसरा उपग्रह आहे, ज्याचा उद्देश भारतीय उपखंडातील वापरकर्त्यांना तसेच भारतीय भूभागापासून सुमारे १५००  किमी पुढे असलेल्या भागातील वापरकर्त्यांना अचूक स्थिती, वेग आणि वेळेची माहिती मिळणार आहे.  याआधी इस्रोने एका निवेदनात म्हटले होते की, एनव्हीएस-०२ मध्ये अचूक वेळेचा अंदाज घेण्यासाठी स्वदेशी आणि खरेदी केलेल्या अणुघड्याळांचे मिश्रण वापरण्यात आले आहे. 

इस्रोने या पूर्वी अंतराळात रोपे उगवण्याच्या यशस्वी प्रयोग केला होता. काही बियाणे अंकुरित करण्यात आली होती. ही मोहीम गगनयान मोहिमेसाठी महत्वाची ठरणार आहे. तर त्यानंतर इस्रोने 

भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. इस्रोने त्यांच्या स्पेस डॉकिंग प्रयोगांतर्गत उपग्रहांना जोडण्यात यश मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा  भारत जगातील चौथा देश बनला आहे. पूर्वी हे तंत्रज्ञान फक्त रशिया, अमेरिका आणि चीनकडे होते. या मोहिमेला  इस्रोने  स्पॅडेक्स असे नाव दिले आहे. इस्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पाडेक्स मोहीम सुरू केली. त्याने दोन लहान उपग्रह - SDX01 (चेसर) आणि SDX02 (लक्ष्य)  पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत पाठवण्यात आले होते.  हे अभियान भविष्यातील चांद्रयान-४, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानकासारख्या अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे ठरणार आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर