इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! देशातील पहिला ॲनालॉग स्पेस प्रकल्प सुरू; लेहमधील निर्जन ठिकाणी एकटे राहणार अंतराळवीर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! देशातील पहिला ॲनालॉग स्पेस प्रकल्प सुरू; लेहमधील निर्जन ठिकाणी एकटे राहणार अंतराळवीर

इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! देशातील पहिला ॲनालॉग स्पेस प्रकल्प सुरू; लेहमधील निर्जन ठिकाणी एकटे राहणार अंतराळवीर

Nov 03, 2024 07:03 AM IST

ISRO analogue lab in leh ladakh : इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. लेह येथे देशातील पहिला ॲनालॉग स्पेस प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकळपयात लेहच्या निर्जन स्थळी गगनयान मोहिमेतील शास्त्रज्ञ, आयआयटीचे अभियंते सहभागी झालेआहेत. नेमका हा प्रकल्प काय आहे, जाणून घेऊयात.

इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! देशातील पहिला ॲनालॉग स्पेस प्रकल्प सुरू; लेहमधील निर्जन ठिकाणी एकटे राहणार अंतराळवीर
इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! देशातील पहिला ॲनालॉग स्पेस प्रकल्प सुरू; लेहमधील निर्जन ठिकाणी एकटे राहणार अंतराळवीर (ISRO- X)

ISRO analogue lab in leh ladakh : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. गगनयांन मोहिमेसाठी देशातील पाहिला ॲनालॉग प्रकल्प लेह लडाख येथे उभारण्यात आला आहे. या ॲनालॉग लॅबमध्ये शास्त्रज्ञ एकटे राहून अभ्यास करणार आहेत.   जमिनीवरच अंतराळासारखे वातावरण तयार करून अंतराळात मानवाला पाठवण्यापूर्वी अंतराळवीरांची तयारी करणे हा त्याचा उद्देश आहे.   

  या प्रकल्पात देशातील अनेक संस्था सहभागी झाल्या आहेत.  ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर, इस्रो, आका स्पेस स्टुडिओ, लडाख विद्यापीठ, आयआयटी मुंबई आणि लडाख ऑटोनॉमस माउंटन डेव्हलपमेंट कौन्सिल  यांचा या प्रकल्पात सहभाग आहे. भारतीय अंतराळवीर इतर ग्रहांवर कसे राहतील हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तिथं वसाहती कशा बांधल्या जाणार? ते कसे जगतील? तिथं काय आव्हानं असतील? पृथ्वीपासून दूर असलेल्या दुसऱ्या ग्रहावर मानवाचा पाया काय असेल? आदि बाबींचा अभ्यास या प्रकल्पाअंतर्गत केला जाणार आहे. 

 लेह लडाख येथील  हवामान कोरडे व थंड आहे. येथील  जमिन उजाड आहे. तसेच हा प्रदेश  उंचावर असून या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही. येथील वातावरण  मंगळ व  चंद्राच्या भूपृष्ठासारखे  मानलं जातं. इतर ग्रहांवरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तसेच या ठिकाणी मानव गेल्यास त्याच्या जीवनावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यासाठी व वैज्ञानिक मोहिमांसाठी ही प्रयोगशाळा एक आदर्श प्रशिक्षण केंद्र आहे.

या प्रयोगशाळेत लडाखमधील खडतर हवामानाशी मानवी शरीर कसे जुळवून घेते, याचाही अभ्यास इस्रोची टीम करत आहे, जे अंतराळवीरांना अंतराळसदृश परिस्थितीची सवय कशी होते हे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

काय आहे प्रकल्प ? 

ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू झालेली महिनाभर चालणारी ही मोहीम भारताच्या चंद्रावर मानवी वस्ती तयार करण्याच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे. यामुळे इतर अवकास  मोहिमा सुरू करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. या प्रकल्पात   हायड्रोपोनिक्स फार्म, स्वयंपाकघर आणि स्वच्छता सुविधा यासारख्या आवश्यक गोष्टींनी सुसज्ज एचएबी -१  नावाचे कॉम्पॅक्ट घरांचा समावेश या मिशनमध्ये आहे. या सोबतच  नवीन तंत्रज्ञान, रोबोटिक उपकरणं, रोबोटिक वाहनं, अधिवास, दळणवळण, वीजनिर्मिती, गतिशीलता, पायाभूत सुविधा आणि साठवण यांची चाचणी या ठिकाणी घेतली जाईल. या ॲनालॉग मिशनमध्ये, प्रतिकूल परिस्थितीत, धोकादायक हवामानात आणि इतर ग्रहांवर मानवी वर्तन कसं बदलतं, हे देखील पाहिलं जाईल. यामध्ये मानवांना एकटं ठेवलं तसंच त्यांना संघात ठेवण्यात येईल. त्यांना समान अन्नपदार्थ दिले जातील. भारत चंद्र, मंगळ आणि त्यापलीकडे दीर्घकालीन अंतराळ मोहिमांची योजना आखत आहे. त्या साठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. 

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर