मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gaganyaan Mission ISRO : गगनयान मोहिमेबाबत इस्रोने दिली खुशखबरी! CE20 क्रायोजेनिक इंजिनाबाबत मोठी अपडेट

Gaganyaan Mission ISRO : गगनयान मोहिमेबाबत इस्रोने दिली खुशखबरी! CE20 क्रायोजेनिक इंजिनाबाबत मोठी अपडेट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 22, 2024 02:33 PM IST

Gaganyaan Mission Update : गगनयान मिशनबाबत इस्रोने मोठी अपडेट दिली आहे. या मोहिमेसाठी CE20 क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यास इस्रोला यश आले असून ही इंजिन 'मानवी रेटिंग' प्राप्त आहे. याबाबत घेण्यात आलेल्या चाचणीनंतर या इंजिनयाची क्षमता समोर आली आहे.'

Gaganyaan Mission Update
Gaganyaan Mission Update

Gaganyaan Mission Update : चांद्रयान-३ आणि आदित्य एल-१ मोहिमेनंतर इस्रोने आता गगनयान मोहिमे बाबत मोठी अपडेट दिली आहे. या मोहिमेतील महत्वाचा टप्पा इस्रोने गाठला आहे. या मोहिमेसाठी लागणारे क्रायोजेनिक इंजिनची चाचणी बुधवारी पूर्ण झाली आहे. या इंजिनाच्या जोरावर अंतराळात भारतीय अंतराळवीरांना पाठवण्याच्या तयारीत इस्रो आहे.

byju news : बायजूसचे संस्थापक रवींद्रन गोत्यात; देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून ईडीचं मोठं पाऊल

CE20 क्रायोजेनिक इंजिनाने गगनयान मोहिमेसाठी 'मानवी मानांकन' मिळवले असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. अनेक चाचण्या केल्यावर या इंजिनाची कार्यक्षमता समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे आता हे इंजिन LVM3 वाहनाच्या वरच्या टप्प्याला पुढे जण्यासाठी ऊर्जा देणार आहे. इस्रोच्या मते, भारताचे पहिली मानवरहित गगनयान मोहीम (G1) २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होऊ शकते.

चाचणी कशी झाली?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, CE20 इंजिन मानवी रेटिंग मानकंन पात्र करण्यासाठी विविध चाचण्या करण्यात आल्या. या इंजिनांचे वेगवेगळ्या परिस्थितीत ३९ हॉट फायरिंग चाचण्या करण्यात आल्या. हे परीक्षण ८ हजार ८१० सेकंद चालले. विशेष बाब म्हणजे मानवी मानांकन पात्रता प्राप्त करण्यासाठी इंजिनाच्या तब्बल ६ हजार ३५० सेकंद चाचण्या करण्यात आल्या.

कंडोमच्या पाकिटांवरून आंध्र प्रदेशात राडा! राजकीय पक्ष भिडले; काय आहे नेमके प्रकरण? वाचा

काय आहे गगनयान मिशन ?

गगनयान मिशन ही भारताची पहिली मानव मोहीम आहे. या मोहिमे अंतर्गत, इस्रो तीन दिवस पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत तीन अंतराळ वीरांना अंतराळात पाठवण्याची तयारी करत आहे. तसेच, त्यांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.

गगनयान मोहिमेसाठी ९ हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास, मानवाला अवकाशात पाठवणारा भारत हा चौथा देश बनेल. याआधी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीनने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

WhatsApp channel