इस्रोनं पुन्हा केला चमत्कार! अंतराळात अंकुरित केल्या बिया; पानेही फुटण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रोनं पुन्हा केला चमत्कार! अंतराळात अंकुरित केल्या बिया; पानेही फुटण्याची शक्यता

इस्रोनं पुन्हा केला चमत्कार! अंतराळात अंकुरित केल्या बिया; पानेही फुटण्याची शक्यता

Jan 05, 2025 09:29 AM IST

ISRO germinated seeds in Space : इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. अंतराळात बिया अंकुरित केल्या आहेत. या अंकुरित झालेल्या बियांना पाने देखील फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इस्रोनं पुन्हा केला चमत्कार! अंतराळात अंकुरित केल्या बिया; पानेही फुटण्याची शक्यता
इस्रोनं पुन्हा केला चमत्कार! अंतराळात अंकुरित केल्या बिया; पानेही फुटण्याची शक्यता

ISRO germinated seeds in Space :  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो)ने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.  इस्रोने वातावरण नसलेल्या अंतराळात बियाणे अंकुरित केले आहेत. या बाबत इस्रोने  शनिवारी माहिती दिली.  सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत चार दिवसांत पीएसएलव्ही-सी ६० या अंतराळयानाच्या पीओएम-४ मध्ये अंतराळात काही बिया या अंकुरित करण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. या बियांना अंकुर फुटला असून आता त्यांना पाने देखील येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काऊसीड लोबिया असे अंकुरित झालेल्या या बियांचे नाव आहे.  

इस्रोने या प्रयोगासाठी  कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज (क्रॉप्स) अंतर्गत एकूण आठ बियाणे अंतराळात पाठवले होते.  विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने ही चाचणी केली आहे. पीएसएलव्ही-सी ६० मोहिमेने ३० डिसेंबर रोजी दोन स्पॅडएक्स उपग्रह अंतराळात सोडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रॉकेटच्या चौथ्या टप्प्याच्या प्रक्रियेत पीओएम-४  प्लॅटफॉर्म पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असून  ३५० किलोमीटर अंतरावर एकूण २४ प्रकारचे प्रयोग इस्रोने अंतराळात सुरू केले आहेत.

काय आहे प्रयोगाचे महत्व ?  

इस्रोने या प्रयोगा बाबत महत्वाची माहिती दिली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, "अंतराळात बियाणांचे  निर्जंतुकीकरण आणि अंकुरित  करण्याचा उद्देश प्रतिकूल परिस्थितीत वनस्पतींच्या वाढीच्या पद्धती समजून घेणे हा आहे.  दीर्घकालीन दृष्टीने त्याच्या परिणामांचे विश्लेषण करून पुढील रणनीती आखली जाणार आहे.  भारत अशा प्रकारचा प्रयोग करणारा अमेरिका, रशिया, चीन नंतर चौथा  देश बनला आहे. 

इस्रोने स्पेस डॉकिंग प्रयोगामध्ये सोशल मीडिया एक्सवरचेसर उपग्रहाचा सेल्फी व्हिडिओ शेअर केला आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ४७० किमी अंतरावर प्रदक्षिणा घालत आहे. मंगळवारी हा प्रयोग  यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव देश ठरेल.

अंतराळात बीज अंकुरित करण्याची  पूर्ण व्यवस्था शास्त्रज्ञांनी केली होती. त्यासाठी कॅमेरा इमेजिंग, ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साईड, तापमान, मातीतील आर्द्रता यावर लक्ष ठेवण्यात आले. सर्वांचा  समतोल ठेवण्यात आला होता. आणि हे बीज अंकुरित झाले आहे. त्याच्या वाढीवर शास्त्रज्ञ लक्ष ठेऊन असून या चाचणीशी संबंधित डेटाचे विश्लेषण करण्यात शास्त्रज्ञ व्यस्त आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर