मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर, Aditya-L1 च्या लाँचिंग दिवशीच झालं निदान, पण..

ISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर, Aditya-L1 च्या लाँचिंग दिवशीच झालं निदान, पण..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 04, 2024 04:45 PM IST

Isro Chief Somanath Cancer : इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सूर्यमिशन आदित्य एल १ लाँचिंगच्या दिवशीच त्यांना पोटाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. मात्र त्यांनी लाँचिंग झाल्यानंतरच उपचार सुूरू केले.

इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर
इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर

भारताचे सूर्य मिशन आदित्य एल-1 च्या लाँचिंग वेळी भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) चे प्रमुख एस सोमनाथ कॅन्सरने ग्रस्त होते. सोमनाथ यांनी एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, स्कॅनिंगमध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. चंद्रयान-३ मिशन लाँचिंगच्या वेळीही आरोग्याच्या काही समस्या होत्या. मात्र त्यावेळेपर्यंत काहीच स्पष्ट नव्हते. सोमनाथ यांनी म्हटले की, आदित्य मिशनच्या दिवशीच त्यांना आजाराचे कारण समजले होते. यामुळे त्यांचे कुटूंबीय चिंतेत होते. 

इतकेच नाही तर इस्त्रोचे शास्त्रज्ञही दु:खी झाले होते. मात्र या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी स्वत:ला कसेतरी सांभाळले. त्याचबरोबर सह शास्त्रज्ञ व कुटूंबालाही समजावले. लाँचिंगनंतर पोटाचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण निदान झाले. पुढील तपासणी व उपचारासाठी ते चेन्नईला गेले. त्यांनी सांगितले की, हा आजार त्यांना जेनेटिकली मिळाली आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर झाला होता.

काही दिवसात कॅन्सरवर शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर केमोथेरेपी सुरू होती. सोमनाथ यांनी सांगितले की, या घटनेने संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला होता. मात्र आता सर्वकाही ठीक झाले आहे. कॅन्सरवर ट्रीटमेंट झाली व ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. अजूनही औषधोपचार सुरू आहे. या कठीण काळात त्याचे कुटूंबीय व मित्रांनी खूप सपोर्ट केला. 

सोमनाथ यांनी सांगितले की, मला माहिती आहे, याच्या उपचारासाठी खूप वेळ लागणार आहे. ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. मात्र ही लाढाई मी नक्की जिंकेन. मी केवळ चार दिवस रुग्णालयात दाखल होतो. त्यानंतर कामावर परतलो. कोणत्याही वेदनेशिवाय मी शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवसापासून काम करत होता.

सतत मेडिकल चेकअप्स आणि स्कॅन करत आहे. मात्र आता मी पूर्णपणे ठीक आहे. आपले काम आणि इस्त्रोचे मिशन आणि लाँचिंगवर संपूर्ण लक्ष आहे. इस्त्रोची सर्व मिशन पूर्ण केल्यानंतरच स्वस्थ बसेन.

IPL_Entry_Point

विभाग