ISRO News : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आज अवकाश क्षेत्रात आणखी एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. इस्रो आज स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरवार अवकाशात स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) म्हंजेत अवकाशात उपग्रह एकमेकांना जोडणार आहे. हे उपग्रह आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रोच्या मते, स्पेस डॉकिंग प्रयोगाचे उद्दिष्ट अंतराळात (PSLV-C60) अंतराळ यानाचे डॉकिंग म्हणजे एक उपग्रह दुसऱ्या उपग्रहाला जोडणे आणि अनडॉकिंग म्हणजे अंतराळात जोडलेली दोन वाहने वेगळे करणे हा आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत मोजक्या काही देशाच्या यादीत जाऊन बसणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सोमवारी आज अंतराळात चमत्कार करणार आहे. इस्रो स्पेस डॉकिंगचा प्रयोग करणार आहे. चंद्रावर माणूस उतरवण्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल मानलं जातं आहे. इस्रोने पीएसएलव्ही रॉकेटद्वारे केलेल्या स्पेस डॉकिंग प्रयोगाचे वेळापत्रक दोन मिनिटे पुढे ढकलले आहे. अंतराळ संस्थेने ही माहिती दिली.
भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे इस्रोनं म्हटलं आहे. ही मोहीम रात्री ९ वाजून ५८ मिनिटांऐवजी आज सोमवारी रात्री १० वाजता सुरू केली जाणार आहे. या मोहिमेचे वेळ बदलण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे की, आज रात्री बरोबर १० वाजता पीएसएलव्ही-सी ६० स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी (स्पेडेक्स) अवकाशात उड्डाण करणार आहे.
स्पेसएजन्सी ने म्हटले आहे की, "स्पेडेक्स ही ऑर्बिटल डॉकिंगमध्ये भारताची क्षमता स्थापित करण्याची महत्वाकांक्षी मोहीम आहे. या प्रयोगामुळे भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा आणि उपग्रह सेवा मोहिमांसाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान ठरणार आहे. ही मोहीम अंतराळात भारताचे अवकाश केंद्र उभारण्याच्या दिशेने देखील महत्वाची ठरणार आहे. रविवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या २५ तासांच्या काउंटडाऊन आज रात्री संपणार असल्याचे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत चीन, रशिया आणि अमेरिकेच्या एलिट लीगमध्ये सामील होईल.
श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातील पहिल्या लाँच पॅडवरून या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पेडेक्स मोहिमेत प्रक्षेपकात दोन प्राथमिक पेलोड आणि २४ दुय्यम पेलोड बसवण्यात आले आहेत. 'स्पेस डॉकिंग' तंत्रज्ञान म्हणजे अंतराळात दोन अंतराळयानांना जोडण्याचे तंत्रज्ञान आहे. हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्याच्या साहाय्याने माणसाला एका अंतराळयानातून दुसऱ्या अंतराळयानात पाठविणे शक्य होणार आहे.
इस्रो लवकरच भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. यानंतर चंद्रावर देखील मानवाला पाठवण्याची मोहीम इस्रो हाती घेणार आहे. चंद्रावर यान पाठवून तेथील मातीचे नमुने परत आणणे आणि अमेरिका, चीन नंतर भारताचे ‘भारतीय अंतराळ स्थानक’ अवकाशात तयार करणे व चालविणे या भारताच्या महत्वाकांशी योजना आहेत. या मोहिमा पूर्ण करण्यासाठी अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरणार आहे. या मोहिमेचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकापेक्षा अधिक रॉकेट प्रक्षेपणाची योजना आखून हे उपग्रह एकमेकांना 'डॉकिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. व वेगळे देखील केले जाणार आहे.
पीएसएलव्ही रॉकेट ए (एसडीएक्स ०१) आणि स्पेसक्राफ्ट बी (एसडीएक्स ०२) या दोन अंतराळयानांना एका कक्षेत घेऊन जाईल. हे दोन्ही सेप्सक्राफ्ट एकमेकांपासून पाच किमी अंतरावर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर इस्रो मुख्यालयातील शास्त्रज्ञ त्यांना तीन मीटर इतके जवळ आणण्याचा प्रयत्न करतील, त्यानंतर हे दोन्ही स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून सुमारे ४७० किमी उंचीवर इस्रोच्या केंद्रातून जोडले जाणार आहे. सोमवारी नियोजित प्रक्षेपणानंतर सुमारे १०-१४ दिवसांनी ही प्रक्रिया केली जाणार आहे.
स्पेडेक्स मोहिमेत 'स्पेसक्राफ्ट ए'मध्ये हाय रिझोल्यूशन कॅमेरा आहे, तर 'स्पेसक्राफ्ट बी'मध्ये मिनिएचर मल्टीस्पेक्ट्रल पेलोड आणि रेडिएशन मॉनिटर पेलोड आहे. हे पेलोड हाय रिझोल्यूशन इमेजरी, नॅचरल रिसोर्स मॉनिटरिंग, वनस्पती अभ्यास इत्यादी प्रयोग करणार आहे.
संबंधित बातम्या