israel vs lebanon : इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले, ग्राउंड ऑपरेशन सुरू; हिजबुल्लाहच्या ठिकाणावर भीषण हल्ले-israeli military limited operation against hezbollah targets in southern lebanon ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  israel vs lebanon : इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले, ग्राउंड ऑपरेशन सुरू; हिजबुल्लाहच्या ठिकाणावर भीषण हल्ले

israel vs lebanon : इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले, ग्राउंड ऑपरेशन सुरू; हिजबुल्लाहच्या ठिकाणावर भीषण हल्ले

Oct 01, 2024 08:14 AM IST

israel vs lebanon : इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या लष्कराने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी लेबनॉनमध्ये घुसून मर्यादित जमीनी लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे.

इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले, ग्राउंड ऑपरेशन सुरू; हिजबुल्लाहच्या ठिकाणावर भीषण हल्ले
इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले, ग्राउंड ऑपरेशन सुरू; हिजबुल्लाहच्या ठिकाणावर भीषण हल्ले (REUTERS)

israel vs lebanon : इस्रायलच्या लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या लष्कराने जमिनी कारवाईला सुरुवात केली आहे. इस्रायलच्या लष्कराने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलच्या लष्कराने मर्यादित जमीनी लष्करी कारवाई सुरू केली आहे. लेबनानी दहशतवादी संघटनेविरोधात इस्रायलने नवी आघाडी उघडली आहे. इस्रायलच्या सीमेजवळील हिजबुल्लाहच्या तळांवर लष्कराने हल्ले केले आहे. हवाई दल, तोफखान्याच्या तुकड्या देखील या कारवाईत लष्कराला मदत करत आहेत. ही कारवाई किती दिवस चालेल, याबाबत आयडीएफने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, या हल्ल्यासाठी इस्रायलची तयारी व प्रशिक्षण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

इस्रायली लष्कराच्या निवेदनानुसार, इस्रायल लेबनॉनच्या सीमेवर असलेल्या हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा तळावर हल्ले केले जात आहेत. यामुळे उत्तर इस्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या अध्यक्षांच्या सुचनानंतर हे हल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. हा लष्करी हल्ला हिजबुल्लाहविरुद्धच्या युद्धाचा पुढचा टप्पा असल्याचे मानले जात आहे.

इस्रायलने हिजबुल्लाहकडून जमिनीवर हल्ला केला असून आक्रमण सुरू केल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, इस्रायलने अमेरिकेला याची माहिती दिली आहे. सीमेवरील हिजबुल्लाहचे तळ नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे.

या पूर्वी लेबनॉनची राजधानी बैरुतवर केले होते हवाई हल्ले

इस्रायलने सोमवारी लेबनॉनची राजधानी बैरुतवर हवाई हल्ले केले होते. त्यापूर्वी तीन इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर बैरूत आणि दक्षिण उपनगरात हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात काही इमारती कोसळल्या व काही नागरिकांचा मृत्यू झाला. या भागात हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. हा भाग हिजबुल्लाहचा गड मानला जातो. गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलवर हिजबुल्लाहने अनेक क्षेपणास्त्र डागले. याला उत्तर म्हणून इस्रायलने हे हल्ले सुरू केले आहेत. इस्रायल सध्या एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. या युद्धमुळे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्थलांतर केले आहे.

जो पर्यंत इस्रायलचा सीमाभाग इस्रायली नागरिकांना राहण्यासाठी सुरक्षित होत नाही, तोपर्यंत हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. त्याचबरोबर इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच जाणार असे हिजबुल्लाहने स्पष्ट केलं आहे. नसरल्लाह आणि इतर प्रमुख नेते मारले गेले असले तरी आपली ताकद कमी झाली नाही व इस्रायल सोबत लढण्यापासून मागे हटणार नाही, असे हिजबुल्लाहने सोमवारी जाहीर केलं.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला महागाईचा भडका! एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला, सणासुदीपूर्वी धक्का

इस्रायली लष्कराला चोख उत्तर देऊ 

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्ला, दक्षिण आघाडीचा कमांडर अली कराकी, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (आयआरजीसी) वरिष्ठ कमांडर अब्बास निलफोरुशान आणि नसरल्लाहच्या गार्डचे जवान मारले गेल्याचे हिजबुल्लाहचे नेते नईम कासिम यांनी स्पष्ट केलं आहे. इस्रायलने लेबनॉनच्या जमिनीवर लष्करी कारवाई केल्यास त्याला चोख उत्तर दिले जाईल. ही लढाई आम्ही जिंकू, असे कासिम यांनी स्पष्ट केलं आहे.

Whats_app_banner