मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रायलचं मोठ पाऊल! लष्कर-ए-तैयबाला दहशवादी संघटना घोषित करत घातली बंदी

इस्रायलचं मोठ पाऊल! लष्कर-ए-तैयबाला दहशवादी संघटना घोषित करत घातली बंदी

Nov 21, 2023 01:38 PM IST

israel lists lashkar e taiba as a terror organisation : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी इस्रायलने मोठे पाऊल उचललं आहे. इस्रायलने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

26/11 terrorist attack
26/11 terrorist attack

israel lists lashkar e taiba as a terror organisation : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला येत्या रविवारी १५ वर्षे पूर्ण होत आहे. दरम्यान, या पूर्वीच इस्रायलने मोठे पाऊल उचलले आहे. भारतात दहशत वादी कारवाया करणारी लष्कर-ए-तैयबा या संघटनेला इस्रायलने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २३८ नागरीक मारले गेले होते. मंगळवारी इस्रायलच्या राजदूताने सांगितले की, भारताने कोणतीही विनंती न करता आम्ही हे पाऊल स्वतःहून उचलले आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी भारताकडे केली असतानाच इस्रायलचे हे पाऊल उचलले आहे.

Amravati crime news : तू मटण खाल्लंस म्हणून भारत हरला, असं म्हणत थोरल्यानं केला धाकट्या भावाचा खून, वडिलांनाही मारहाण

मंगळवारी, इस्रायली दूतावासाने एका निवेदन जरी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, "भारत सरकारने लष्करला दहशवादी संघटना करण्याची कोणतीही विनंती न करता, इस्रायलने सर्व औपचारिकता पूर्ण करत लष्कर-ए-तैयबाला इस्रायलच्या दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले आहे. या साठी सर्व आवश्यक चौकशी आणि तपास पूर्ण करण्यात आला आहे."

२६/११ च्या १५ वर्षपूर्तीचा उल्लेख

लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना, इस्रायली दूतावासाने म्हटले आहे की. इस्रायलच्या या निर्णयामुळे इस्रायल, भारत आणि अनेक देशांना धोका असलेल्या दहशतवादी संघटनांची यादी करण्यात आली आहे. लष्कर सारख्या संघटना ज्या सीमेवर किंवा सीमेच्या आत मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करत आहेत. इस्रायलच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गेल्या काही महिन्यांत दहशतवादाविरुद्ध लढताना जगाला मोठा संदेश दिला असून लष्कर-ए-तैयबा संघटनेवर तातडीने कारवाई करून त्याचा दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : सुरक्षेचे कडे भेदून अट्टल गुन्हेगार येरवडा जेलमधून फरार; कारागृह प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

इस्रायली दूतावासाने म्हटले आहे की, "लष्कर-ए-तैयबा ही एक घातक दहशतवादी संघटना आहे, जी शेकडो भारतीय नागरिकांच्या तसेच इतर अनेकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या या घृणास्पद कृत्यांमुळे शांतताप्रिय देशांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी इस्रायलने भारताकडे केली होती. भारताने या बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

हमासवर ऑक्टोबर २०१५ मध्ये इस्रायलच्या हद्दीत घुसून नरसंहार घडवून हजारो लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. हमासवर १४०० हून अधिक इस्रायलींची हत्या केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. इस्रायली फौजा एक महिन्यापासून गाझामध्ये तैनात आहेत. गाझावर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले आणि जमिनी लष्करी कारवाई करण्यात येत आहे. इस्रायलच्या सैन्याने उत्तर गाझा ताब्यात घेतले आहे. या संघर्षात आता पर्यंत गाझा पट्टीमध्ये १२,००० हून अधिक नागरीक ठार मारले गेले आहेत. दरम्यान, इस्रायलच्या या निर्णयानंतर भारत काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

WhatsApp channel
विभाग