israel hamas war : इस्रायली लष्कराने शनिवारी उत्तर गाझा पट्टीवर भीषण हवाई हल्ले करून हमासचे कमांड सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी ही माहिती दिली आहे. हगरी म्हणाले, "आम्ही उत्तर गाझा पट्टीतील हमासचे लष्करी सेंटर नष्ट केले आहे," या लढाईत आला हमास कमांडरशिवाय लढत असल्याचेही त्यांनी सांगितले. "आता आमचे लक्ष गाझा पट्टीच्या मध्यभागी आणि गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील हमासचा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यावर आहे." या कामाला थोडा वेळ लागेल, असेही ते म्हणाले.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर इतिहासातील सर्वात प्राणघातक हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझामधील हमासया दहशतवादी संघटनेला चिरडून टाकण्याची शपथ घेतली होती. अधिकृत आकडेवारीवर आधारित एएफपीच्या आकडेवारीनुसार सुमारे १ हजार १४० नागरीक या हल्ल्यात ठार झाले आहेत. त्यापैकी बहुतेक सामान्य नागरिक आहेत. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासच्या सदस्यांनी सुमारे २५० लोकांना ओलीस ठेवले होते. त्यापैकी १३२ अजूनही त्यांच्या कैदत आहेत.
हमास संचालित गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान २२ हजार ७२२ नागरीक मारले गेले आहेत. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
हगारी म्हणाले, मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये हमासला संपविण्याच्या लष्करी प्रयत्नां यश आले. मध्य गाझा पट्टीतील निर्वासित शिबिरे गर्दीने भरलेली आहेत. यात दहशतवादी देखील आहेत. दक्षिणेतील खान युनिसच्या मोठ्या शहरी भागात बोगद्यांचे भूमिगत जाळे आहे.त्यामुळे या मोहिमेला उशीर लागत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
याआधी शनिवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, त्यांच्या सरकारने हमास समूळ नष्ट करण्यासाठी, तसेच सर्व ओलीसांना पुन्हा मायदेशात आणण्यासाठी ही हल्ले सुरू आहेट. जेणेकरून भविष्यात गाझाला पुन्हा कधीही इस्रायलला धोका निर्माण होणार नाही. याची खात्री करण्याच्या सूचना लष्कराला दिल्या आहेत. “आपण आपली सर्व उद्दिष्टे साध्य करेपर्यंत युद्ध थांबू नये,” असे देखील एका निवेदनात म्हटले आहे.
संबंधित बातम्या