Israel-Iran Tension Row: इस्रायल सध्या गाझा, लेबनॉन आणि इराणसोबत वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्ध लढत आहे. या युद्धामुळे मध्य आशियात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि इराण मधील हवाई अंतर १७०० किलोमीटर असून लंडन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संरक्षण तज्ज्ञ फॅबियन हिंगे यांच्या मते, इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही. इराणने ज्या प्रकारे इस्रायलवर आधुनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, त्यावरून इराणची विलक्षण ताकद दिसून येते. जर दोन्ही देशात पूर्ण युद्ध झाल्यास इराण इस्रायलला कडवे आव्हान देण्याची शक्यता आहे.
इस्रायल आणि इराण युद्धामुळे जगाचे टेंशन वाढलं आहे. इस्रायलने हिजबूल्लाच्या टॉप कमांडरची हत्या केल्याने इराण चवताळला आहे. याच बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलवर २०० हून अधिक आंतरखंडिय क्षेपणास्त्र डागले आहे. याला इस्रायल कसे उत्तर देणार या कडे आता जगाचे लक्ष लागून आहे. इराणकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे व ड्रोन असून युद्धजन्य परिस्थितीत इस्रायलला उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. इराणने इस्रायलला डोळ्यासमोर ठेवून शस्त्रास्त्रे तयार केली आहेत. याशिवाय क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इराणकडे १५ हजार हवाई संरक्षण यंत्रणा आहेत. तर अॅरो-३ आणि आधुनिक आयर्न डोम हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायल सुसज्ज आहे. या यंत्रणेमुळे इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात इस्रायल यशस्वी ठरला आहे.
इस्रायलच्या आयर्न डोम लष्करी प्रणालीने इस्रायलवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ले ९० टक्के निष्प्रभ केले आहेत. इराणने डागलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात इस्रायलला यश आले आहे. रडारच्या साहाय्याने शत्रूच्या क्षेपणास्त्राची अचूक ओळख करून ते हवेतच नष्ट करण्यास हे क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा सक्षम आहे. हवेतच शत्रूची क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी ही यंत्रणा एकाच वेळी २० हून अधिक हल्ले करते.
इस्रायल आपल्या लष्करी ताकदीसाठी ओळखला जातो. इस्रायलचे संरक्षण बजेट ३०.५ अब्ज डॉलर आहे. त्यात १,६९,५०० सैनिक आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती आणि युद्धांना सामोरे जाण्यासाठी ४,६५,००० राखीव सैनिक आहेत.
लढावू विमाने - ३३९
एफआय-१६ - १९६
एफ-१५ - ८३
एफ-३५ - ३०
हेलिकॉप्टर्स-१४२
अपाचे हेलिकॉप्टर्स-४३
रणगाडे - २२००
तोफा- ५३०
युद्धनौका-पाळत
ठेवणारी यंत्रणा- ४९
पाणबुड्या- ५
इराणबद्दल बोलायचे झाले तर इस्रायलसमोर त्याचे संरक्षण बजेट केवळ ६.८५ अब्ज डॉलर आहे. मात्र, सैनिकांच्या संख्येत इस्रायल इस्रायलपेक्षा खूप पुढे आहे. इराणकडे एकूण ६१०००० सैनिक आहेत. यात १९०००० राखीव सैनिक आहेत.
फायटर जेट - ५५१
क्षेपणास्त्रे ३५००
एस-३०० क्षेपणास्त्रे रशियाकडून खरेदी
रणगाडे १५००
तोफ २५३
ड्रोन १८००
१९-२७ पाणबुड्या
३२ युद्धनौका
३५० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे
संबंधित बातम्या