अमेरिका बनली इस्रायलची ढाल! इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचे लष्कराला आदेश, तणाव आणखी वाढणार-israel iran war latest updates joe biden us army to aid missile attack ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अमेरिका बनली इस्रायलची ढाल! इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचे लष्कराला आदेश, तणाव आणखी वाढणार

अमेरिका बनली इस्रायलची ढाल! इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचे लष्कराला आदेश, तणाव आणखी वाढणार

Oct 02, 2024 09:17 AM IST

Israel-Iran Tension Row : इराणने इस्रायलवर ४०० पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागल्याने युद्धाचा भडका वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचा या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी अमेरिकन लष्कराला सज्ज राहण्यासाठी सांगितलं आहे.

अमेरिका बनली इस्त्रायलची ढाल! इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचे लष्कराला आदेश, तणाव आणखी वाढणार
अमेरिका बनली इस्त्रायलची ढाल! इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचे लष्कराला आदेश, तणाव आणखी वाढणार

Israel-Iran Tension Row : इस्रायल आणि इराण यांच्यात वादाचा भडका उडाला आहे. इराणनं मंगळवारी रात्री इस्रायलवर २०० क्षेपणास्त्र डागले आहेत. क्षेपणास्त्र हल्ला होताच इस्त्रायलमध्ये सायरन वाजू लागले. त्यानंतर सामान्य लोकांना बॉम्बरोधक ठिकाणांमध्ये आसरा घेतला. इस्रायलवरील हल्ल्यानंतर अमेरिकेकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी देशातील सैन्याला आदेश देत इराणची क्षेपणास्त्र हवेतच उध्वस्त करण्यास सांगितलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस येथे उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत इराणनं इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याचा आढावा घेण्यात आला. अमेरिकेनं या स्थितीवर लक्ष ठेवलं आहे. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा टीम या संदर्भात नियमितपणे अपडेट घेत आहे. जो बायडन यांनी अमेरिकेच्या सैन्याला इराणविरुद्ध इस्त्रायलची मदत करण्याचे आदेश दिले. इस्त्रायलवर हल्ला करणारी क्षेपणास्त्र देखील पाडण्याचे आदेश दिले.

इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. इस्रायलने इराणला परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. अमेरिकाही इस्रायलच्या समर्थनार्थ आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल आणि इराणमधील संघर्ष थांबवण्यासाठी शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, मंगळवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन लष्कराला इस्रायलला मदत करण्याचे निर्देश दिले. इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून इस्रायलचे रक्षण करण्याच्या अमेरिकेच्या तयारीचा आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी सांगितले की, आज इराणने इस्रायलमधील लक्ष्यांवर सुमारे २०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलला या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी अमेरिकन लष्कराने इस्रायलच्या संरक्षण दलाशी समन्वय साधला. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सध्या तरी कुणीही मृत्युमुखी अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

इस्रायलचे कोणतेही सामरिक किंवा लष्करी मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही. आम्ही इराण आणि त्याच्या राजकीय नेत्यांकडून देण्यात येणारया धमक्या आणि हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहोत.

इराणने इस्रायलवर डागली अनेक क्षेपणास्त्रे

इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली असून ज्यामुळे इस्रायली नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला, तर हल्ल्यानंतर इराणमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या हल्ल्यात जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नव्हते. इस्रायलने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची एयर डीफेन्स यंत्रणा इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेला मदत करेल.

इराणने म्हटले आहे की, त्यांची बहुतेक क्षेपणास्त्रे अचूकपणे त्यांच्या लक्ष्यांवर कोसळली आहेत. इराणच्या निमलष्करी रिव्होल्युशनरी गार्डने सांगितले की, इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी ९० टक्के क्षेपणास्त्र अचूकपणे लक्ष्यभेद करतात.

इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर देण्यात आलेल्या वृत्तानुसार इस्रायलच्या हवाई आणि रडार यंत्रणेसह सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. तसेच इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर देखील हल्ले करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आहे. इराणच्या अज्ञात ठिकाणांहून अंधारात क्षेपणास्त्रे डागल्याची फुटेजही प्रसारित करण्यात आले आहेत. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवरही अराक, कोम आणि तेहरानमध्ये इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याचा आनंद साजरा करताना लोक दिसत आहेत.

Whats_app_banner