इराणवरील इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर चर्चेत असलेले 'प्रिव्हेंटिव्ह वॉर' म्हणजे नेमकं काय? वाचा!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इराणवरील इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर चर्चेत असलेले 'प्रिव्हेंटिव्ह वॉर' म्हणजे नेमकं काय? वाचा!

इराणवरील इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर चर्चेत असलेले 'प्रिव्हेंटिव्ह वॉर' म्हणजे नेमकं काय? वाचा!

Updated Oct 28, 2024 11:42 AM IST

what is preventive war :युद्ध मोठ्या प्रमाणावर पसरू नये आणि इराणपर्यंत संदेश पोहोचावा यासाठी इस्रायलने प्रिव्हेंटिव्ह वॉर ही हल्ल्याची पद्धत निवडल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

इराणवरील इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर चर्चेत असलेले 'प्रिव्हेंटिव्ह वॉर' म्हणजे नेमकं काय? वाचा!
इराणवरील इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर चर्चेत असलेले 'प्रिव्हेंटिव्ह वॉर' म्हणजे नेमकं काय? वाचा!

what is preventive war : इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. इस्रायलच्या राजधानीला लक्ष्य करून प्रामुख्याने हे हल्ले करण्यात आले होते. इराणच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने शनिवारी इराणच्या तेहरानवर  हल्ले केले. यात प्रामुख्याने इराणच्या लष्करी तळांचे नुकसान झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान हे हल्ले करतांना  इराणचे पॉवर ग्रीड, अण्वस्त्रे आणि नागरी संस्थांना लक्ष्य करू नये, याची खबरदारी इस्रायलने घेतली. युद्ध मोठ्या प्रमाणावर पसरू नये आणि इराणपर्यंत संदेश पोहोचावा यासाठी इस्रायलने हल्ल्याची ही पद्धत निवडल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

इस्रायलच्या या हल्ल्याला प्रिव्हेंटिव्ह वॉर असे म्हटले जात आहे. यालाच युद्ध रणनीती म्हणतात.  जेव्हा हल्ला करणारा देश मुद्दाम शत्रूवर हल्ला करतो आणि युद्धाची व्याप्ती वाढू नये याची प्रामुख्याने काळजी घेतली जाते.  अशा वेळी अनेकदा हल्लेखोर देश समोरच्याला आपली शक्ती दाखण्यासाठीच त्याच्यावर हल्ले करतो. प्रतिबंधात्मक युद्ध बऱ्याचदा उद्भवते जेव्हा एखाद्याने आधी  हल्ला केला आहे आणि त्याला त्या हल्ल्याचे उत्तर देऊन आम्ही देखील कमी नाही हा संदेश द्यायचा असतो.  प्रतिबंधात्मक युद्ध पद्धती अंतर्गत पहिला हल्ला सहन केलेले देश त्या हल्ल्याला उत्तर देतात. पण या हल्ल्याची तीव्रता एवढी जास्त नसते. अशा हल्ल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढत नाही. फक्त समोरच्या राष्ट्राला आम्ही देखील कमी नाही हा थेट संदेश देणे हा या युद्धपद्धतीचा हेतु असतो.  

प्रिव्हेंटिव्ह वॉर  नावाच्या शोधनिबंधात लॉस अबिंक आणि लू डोंग लिहितात, "जेव्हा एखाद्या नव्या देशाचा लष्करी शक्ति म्हणून  उदय होतो. तेव्हा नवी  आव्हाने उभी राहतात. तेव्हा शक्तिशाली देश अनेकदा प्रतिबंधात्मक युद्ध पद्धती अवलंबतात. ही युद्धपद्धतीला बार्गेनिंग पॉवर देखील म्हटले जाते.  जेव्हा दोन्ही देश तुल्यबळ असतात तेव्हा या युद्धपद्धतीचा वापर केला जातो.  इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचा विचार केल्यास दोन्ही देश तुल्यबळ आहेत.  इराणने सडेतोड इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले करून प्रत्युत्तर दिले आहे. तर  युद्ध जास्त चिघळू नये व आम्ही देखील तुमच्यावर हल्ला करण्यास सक्षम आहोत हे दाखव्यासाठी इस्रायलने देखील हल्याची व्याप्ती मर्यादित ठेवत आपला हेतु साध्य केला आहे.   

 इस्रायलकडून होणारे मर्यादित हल्ले इराणसाठीही फायदेशीर ठरले आहेत. इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे आव्हान इराणसमोर राहणार नाही. इस्रायलच्या आक्रमकतेला कोणत्याही किंमतीवर प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सरकारवर देशांतर्गत पातळीवर दबाव येणार नाही. अशा प्रकारे मर्यादित युद्धपरिस्थिती निर्माण होते. अमेरिकेनेही इस्रायलला हाच सल्ला देत शांत प्रतयुतर न देता शांत राहण्यास सांगितले होते.  इस्रायलने देखील हे युद्ध आणखी वाढवू नये, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. इस्रायल  हिजबुल्ला आणि हमासवर थेट हल्ले करत राहू शकतो, पण त्याने थेट कोणत्याही देशाशी युद्ध करू नये.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर