इस्रायलचा लेबनॉनमध्ये विध्वंस सुरूच! संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, परदेशी दूतावासांवर केले भीषण हवाई हल्ले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रायलचा लेबनॉनमध्ये विध्वंस सुरूच! संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, परदेशी दूतावासांवर केले भीषण हवाई हल्ले

इस्रायलचा लेबनॉनमध्ये विध्वंस सुरूच! संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, परदेशी दूतावासांवर केले भीषण हवाई हल्ले

Nov 19, 2024 09:38 AM IST

Israel attack on lebanon : दक्षिण लेबनॉनपाठोपाठ आता इस्रायलनेही मध्य बैरूतवर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री उशिरा इस्रायलने लेबनॉनच्या संसद भवन, पंतप्रधान कार्यालय आणि दूतावासांनवर हवाई हल्ले केले.

इस्रायलचा लेबनॉनमध्ये विध्वंस सुरूच! संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, परदेशी दूतावासांवर केले भीषण हवाई हल्ले
इस्रायलचा लेबनॉनमध्ये विध्वंस सुरूच! संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, परदेशी दूतावासांवर केले भीषण हवाई हल्ले (AFP)

Israel attack on lebanon : इस्रायलने लेबनॉनच्या राजधानी बैरूत येथे दाट लोकवस्तीच्या रहिवासी भागाला लक्ष्य करून सोमवारी रात्री उशिरा हवाई हल्ले केले. या हल्ल्यात बेरूतमधील संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय, संसद भवन, पंतप्रधान कार्यालय आणि अनेक दूतावासांवर देखील हल्ले करण्यात आले आहे.  लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बैरूतच्या जौक अल-ब्लाट भागात दोन क्षेपणास्त्रे डागन्यात आली.  

अमेरिकेच्या राजदूतांनी शस्त्रसंधी चर्चेसाठी आपला दौरा पुढे ढकलल्याच्या वृत्तानंतर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात रुग्णवाहिकेचे सायरन वाजत होते, मात्र या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नगरिकांची  धिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. घटनास्थळी असलेल्या असोसिएटेड प्रेसच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मोठ्या संख्येने जीवितहानी झाली आहे. हवाई हल्ल्याचे लक्ष्य अद्याप अस्पष्ट आहे. इस्रायलच्या लष्कराने या हल्ल्याचा कोणताही पूर्वइशारा दिलेला नव्हता.

महिनाभराच्या विश्रांतीनंतर इस्रायलने सलग दुसऱ्या दिवशी मध्य बैरूतवर हल्ला केला. रविवारी रास अल-नबा परिसरात झालेल्या या हल्ल्यात हिजबुल्लाहचा माध्यम प्रवक्ता मोहम्मद अफीफ यांच्यासह एका महिलेसह सहा जण ठार झाले होते.

हल्ल्यानंतर काही मिनिटांतच लेबनॉनचे काळजीवाहू पंतप्रधान नजीब मिकाती यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "लेबनॉनवरील रक्तरंजित आणि विध्वंसक इस्रायली हल्ले थांबवून आंतरराष्ट्रीय ठराव, विशेषत: ठराव १७०१ ची अंमलबजावणी करणे दोन्ही देशाकडून अपेक्षित आहे.  २००६ मध्ये मंजूर झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव १७०१ मध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये बफर झोन तयार करण्यात आला होता.  इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शत्रुत्व कमी करणे हा या कराचा हेतु होता. मात्र, हिजबूल्लाहने मोठ्या प्रमाणात इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याने इस्रायलने लेबनॉनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर