isis india head arrested : मोठी बातमी! इसिसच्या भारतातील दोन म्होरक्यांना अटक! निवडणुकीत घातपात करण्याचा होता मोठा डाव-isis india head among two arrested in assam ahead of loksabha election ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  isis india head arrested : मोठी बातमी! इसिसच्या भारतातील दोन म्होरक्यांना अटक! निवडणुकीत घातपात करण्याचा होता मोठा डाव

isis india head arrested : मोठी बातमी! इसिसच्या भारतातील दोन म्होरक्यांना अटक! निवडणुकीत घातपात करण्याचा होता मोठा डाव

Mar 21, 2024 09:56 AM IST

isis india head arrested : स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दोघांना आसामच्या धर्मशाळा येथून ईसीसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दोघांना आसामच्या धर्मशाळा येथून ईसीसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दोघांना आसामच्या धर्मशाळा येथून ईसीसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

isis india head arrested : आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या दोन कार्यकर्त्यांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळून अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीत या दोघांची घातपात करण्याचा मोठा कट रचला होता. मात्र, पोलिसांनी तो उधळून लावला. पोलिसांनी सांगितले की, धुबरी जिल्ह्याजवळील बांगलादेशातून आयसीसचे दहशतवादी भारतात घुसले अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये ISIS इंडियाचा प्रमुख हॅरिस फारुकी आणि त्याच्या एका सहाय्यकाचा समावेश आहे.

Pune katraj firing : क्रिकेटच्या वादातून पुण्यातील कात्रज येथे गोळीबार; दोघे जखमी

आसाम एसटीएफचे महानिरीक्षक आयपीएस पार्थसारथी महंता म्हणाले, "भारतातील आयसीसचे दोन प्रमुख शेजारच्या देशात (बांगलादेश) तळ ठोकून असल्याची माहिती भागीदार गुप्तचरांकडून सुरक्षा दलांना मिळाली होती. भारतात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याच्या तयारीत असलेले दोघे धुबरी सेक्टरमधून भारतात प्रवेश करणार होते. महंत म्हणाले की, या बाबत माहिती मिळताच त्यांनी विशेष पथक तयार करून शोध मोहीम राबवली. एसटीएफच्या पथकाने अतिरिक्त एसपी कल्याणकुमार पाठक आणि इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत दोघांना अटक केली. यात त्यांना स्थानिक पोलिसांचे मोठे सहकार्य लाभले.

earthquake in nanded and hingoli : भूकंपाच्या धक्क्याने हादरले नांदेड आणि हिंगोली; घरांना तडे, नागरिक रस्त्यावर

आसामचे पोलिसांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणवज्योती गोस्वामी यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे, स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दोघांना धरमशाला परिसरातून या दोन दहशतवाद्यांना पकडले आणि नंतर त्यांना गुवाहाटी येथील एसटीएफ कार्यालयात आणले. या दोघांची ओळख पटली असून आरोपी हॅरिस फारुकी उर्फ ​​हॅरिस अजमल फारुकी (रा. चक्रता, डेहराडून) हा भारतातील इसिसचा प्रमुख आहे. त्याचा साथीदार आणि पानिपत निवावी अनुराग सिंग उर्फ ​​रेहान याने इस्लाम धर्म स्वीकारला असून त्याची पत्नी बांगलादेशी नागरिक आहे.

हे दोघेही कट्टरपंथी असून भारतातील आयसीसचे जहाल दहशतवादी आहेत. दोघेही भरती, दहशतवादी प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करून दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट रचत होते. या दोघांविरुद्ध एनआयए, दिल्ली, एटीएस आणि लखनऊ आणि इतर ठिकाणी अनेक खटले प्रलंबित आहेत. "आसामचे एसटीएफ या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी एनआयएकडे सोपवणार आहे.

Whats_app_banner
विभाग