Bharatiya Nyaya Sanhita: भारतीय न्याय संहितेत अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे की नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharatiya Nyaya Sanhita: भारतीय न्याय संहितेत अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे की नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

Bharatiya Nyaya Sanhita: भारतीय न्याय संहितेत अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे की नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

Updated Aug 14, 2024 07:43 AM IST

Bharatiya Nyaya Sanhita : नव्या भारतीय न्याय संहितेत अनैसर्गिक शरीर संबधाबाबत शिक्षेची काय तरतूद आहे ? जर ही तरतूद नसेल तर हा गुन्हा नाही का असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केला आहे.

नव्या कायदा प्रणालीत अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे की नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
नव्या कायदा प्रणालीत अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे की नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल (HT_PRINT)

Bharatiya Nyaya Sanhita : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला भारतीय न्यायिक संहितेत (BNS) अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी दंडात्मक तरतुदी वगळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. भारतीय दंड संहिते (IPC) ऐवजी आता संपूर्ण देशात भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) लागू करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेत संमतीशिवाय अनैसर्गिक शारीरिक संबंधाच्या मुद्द्यावर विधिमंडळाने लक्ष देण्याची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने हा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे. न्यायमुतरी यांनी म्हटलं की अनैसर्गिक शारीरिक संबंधाबाबत नव्या भारतीय दंड संहितेत शिक्षेची तरतूद कुठे आहे? यात अजिबात तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच या बाबत काही कायदा अस्तित्वात नाही. या बाबत काहीतरी झालेच पाहिजे. प्रश्न असा आहे की जर या बाबत शिक्षेची तरतुद नसेल तर तो गुन्हा नाही का? असा सवाल देखील कोर्टानं विचारला आहे.

खंडपीठाने म्हटलं आहे की, 'आम्ही शिक्षेचे प्रमाण ठरवू शकत नाही, परंतु संमतीशिवाय होणारे अनैसर्गिक लैंगिक संबंध विधिमंडळाने विचारात घेतले पाहिजेत. न्यायालयाने केंद्राच्या वकिलांना या विषयावर सूचना मागविण्यासाठी वेळ दिला आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

वकील देश गुलाटी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर न्यायालय सुनावणी करत होते. जे वैयक्तिकरित्या कोर्टात हजर झाले होते. त्यांनी भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमुळे निर्माण झालेली 'आवश्यक कायदेशीर कमतरता' दूर करण्याचा प्रयत्न केला होता. बीएनएसच्या अंमलबजावणीमुळे भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ रद्द करावे लागले. वकील म्हणाले की नव्या न्याय प्रणालीत भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ च्या समतुल्य कोणतीही तरतूद नाही, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती, विशेषतः 'एलजीबीटीक्यु' समुदाय प्रभावित होईल.

त्यांनी एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांवरील कथित अत्याचारांवरही प्रकाश टाकला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ मध्ये दोन प्रौढांमधील संमतीशिवाय अनैसर्गिक संभोग, अल्पवयीन मुलांविरुद्ध लैंगिक कृती आणि प्राण्यांसोबत लैंगिक संबंधांना शिक्षा दिली जाते. जुन्या आयपीसीची जागा आता भारतीय न्याय संहितेने घेतली आहे. याची अमलबजावणी ही १ जुलै २०२४ रोजी करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर