एका प्रकरणाच्या निकालात कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta high court) स्पष्ट केले की, महिलांना 'स्वीटी' आणि 'बेबी' संबोधणे (sweetie and baby sexual comment) नेहमी चुकीचं असू शकत नाही. कोलकाता हायकोर्टाने म्हटले की, काही सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी ही नावे प्रचलित आहेत. या शब्दांचा वापर नेहमी सेक्शुअल सेंटीमेंट उघड करत नाही. बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार कोलकाता हायकोर्टने याच निकालावेळी इशाराही दिला की, जर कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषण विरोधी कायदा (POSH अधिनियम) च्या तरतुदींचा दुरुपयोग केला जात असले तर हे महिलांसाठी अनेक अडचणी निर्माण करू शकतो. न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांनी लैंगिक गुन्ह्यातील आरोपांशी संबंधित प्रकरणाच्या सनावणीत ही टिप्पणी केली.
महिलेचा वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप -
या प्रकरणात एका महिलेचा आरोप होता की, कामाच्या ठिकाणी तिचे वरिष्ठ अधिकारी तिच्याबाबत स्वीटी आणि बेबी सारख्या शब्दांचा वापर करतात. तटरक्षक दलात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आरोप केला होता की, तिच्या वरिष्ठांनी अनेक पद्धतीने तिचे लैंगिक शोषण केले होते. आपल्या तक्रारीत महिलेने म्हटले होते की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या शब्दात लैंगिक संकेत होते.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते की, त्यांनी कधीही या शब्दांचा वापर लैंगिक संकेताच्या रुपात केला नाही. त्यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने या शब्दांवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी या शब्दाचा वापर बंद केला होता. आपल्या निकालात हायकोर्टाने स्वीकार केले की, आंतरिक तक्रार समिती (आयसीसी) द्वारे अशा शब्दांचा वापर अयोग्य मानला होता. मात्र असेही म्हटले होते की, या शब्दांना सेक्सुअल सेंटीमेंटशी जोडणे योग्य नाही.
काँग्रेसमधून निलंबित नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सोमवारी दावा केला की, सुप्रीम कोर्टात राम मंदिर जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाचा निकाल आल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एका बैठकीत म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सुपरपावर कमीशन तयार करून या निकालाला शाह बानो प्रकरणाप्रमाणे बदलले जाईल. काँग्रेसने हकालपट्टी करण्याच्या आधीपासून पक्षावर टीका करत असलेल्या कृष्णम यांनी रविवारी दावा केला होता की, ४जूननंतर काँग्रेस दोन गटात विभागली जाईल.
संबंधित बातम्या