Indian Railway : ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना मिळणार मोफत भोजन; ‘या’ गाड्यांमध्ये मिळते खास सुविधा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railway : ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना मिळणार मोफत भोजन; ‘या’ गाड्यांमध्ये मिळते खास सुविधा

Indian Railway : ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना मिळणार मोफत भोजन; ‘या’ गाड्यांमध्ये मिळते खास सुविधा

Dec 04, 2024 01:56 PM IST

Railway Food : राजधानी, शताब्दी किंवा दुरंतो गाड्या उशिराने धावत असतील तर प्रवाशांना मोफत जेवण मिळणार आहे, अशी तरतूद करण्यात आली आहे. नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा स्नॅक, डिनर अशा विविध पर्यायांमधून प्रवासी निवडू शकतात.

ट्रेन लेट झाल्यास मिळणार मोफत भोजन
ट्रेन लेट झाल्यास मिळणार मोफत भोजन

IRCTC Indian Railway : दाट धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे या हिवाळ्यात गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेकदा गाड्यांना खूप विलंब झाल्याने  प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही अडचण कमी करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने खास व्यवस्था केली आहे.

जर राजधानी, शताब्दी किंवा दुरंतो एक्सप्रेस सारखी तुमची ट्रेन नियोजित वेळेपेक्षा दोन तास किंवा त्याहून अधिक विलंबाने आली तर आयआरसीटीसीच्या केटरिंग पॉलिसी अंतर्गत तुम्हाला मोफत जेवण मिळेल. प्रवाशांची सोय आणि सोयी-सुविधा लक्षात घेऊन ही सेवा दिली जाते. मात्र, सध्या ही सुविधा केवळ प्रीमियम गाड्यांपुरतीच मर्यादित आहे.

विशेष म्हणजे भोजनाची व्यवस्था दिवसाच्या वेळेनुसार केली जाते -

चहा/कॉफी सेवा : चहा किंवा कॉफीसोबत बिस्किटं, साखर किंवा शुगर फ्री पॅकेट्स आणि मिल्क क्रीमर असतील.

नाश्ता किंवा संध्याकाळचा चहा: चार ब्रेड स्लाइस (पांढरे किंवा तपकिरी), लोणी, फळांचे पेय (२०० मिली) आणि चहा किंवा कॉफी.

दुपारचे किंवा रात्रीचे जेवण: यात पिवळी डाळ, राजमा किंवा चणे, लोणच्याची पाकिटे किंवा तांदळाबरोबर मिश्र भाजी आणि पुरीसोबत लोणच्याची पाकिटे यांचा समावेश असेल.

वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी प्रवासी या प्रीमियम गाड्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देतात. मात्र आता या गाड्या उशिराने धावत असतील तर प्रवाशांना मोफत जेवण मिळणार आहे, अशी  तरतूद करण्यात आली आहे. नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा स्नॅक, डिनर अशा विविध पर्यायांमधून प्रवासी निवडू शकतात.

तिकीट रद्द संपूर्ण पैसे मिळणार परत-

जर ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त विलंबाने धावत असेल किंवा डायव्हर्ट केली असेल तर प्रवासी त्यांचे तिकीट रद्द करू शकतात आणि संपूर्ण परतावा मिळवू शकतात. ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांसाठी मूळ बुकिंग मोडद्वारे परतावा घेता येईल. काऊंटरवरून खरेदी केलेली तिकिटे रद्द करण्यासाठी स्टेशनवर जाऊन कॅश रिफंड घ्यावा लागणार आहे.

अन्य विशेष सुविधा-

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून मोफत वेटिंग रूमची सुविधा दिली जाते. प्रवाशांना खाण्यापिण्याचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेचा हा उपक्रम प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. जर तुम्हीही थंडीच्या हंगामात रेल्वे प्रवासाचा बेत आखत असाल तर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर