IRCTC ची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; प्रवासी गोंधळले! नव्या खात्यासाठी २४ तास वाट पाहावी लागणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IRCTC ची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; प्रवासी गोंधळले! नव्या खात्यासाठी २४ तास वाट पाहावी लागणार

IRCTC ची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; प्रवासी गोंधळले! नव्या खात्यासाठी २४ तास वाट पाहावी लागणार

Dec 09, 2024 03:16 PM IST

irctc Outage News : आयआरसीटीसीची सेवा सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी अचानक ठप्प झाली. यामुळे सुमारे १ तास लाखो प्रवासी त्रस्त झाले होते. आता ही सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी काही निर्बंध लादण्यात आले आहेत.

आयआरसीटीसीची सेवा ठप्प! तिकिट बुक करतांना प्रवाशांना अडचणी;  २४ तासांत कोणतेही नवे खाते उघडता येणार नाही
आयआरसीटीसीची सेवा ठप्प! तिकिट बुक करतांना प्रवाशांना अडचणी; २४ तासांत कोणतेही नवे खाते उघडता येणार नाही

IRCTC Down Marathi News : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सेवेवर परिणाम झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना बुकिंग करता आले नाही, तर अनेकांचे बुकिंग रद्द आपोआप रद्द झाले. बराच वेळ डाऊनटाईम मेसेज वेबसाईटवर झळकत होता. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, प्रवाशांना २४ तास नवीन खाते तयार करता येणार नाही.

तब्बल तासभर आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ई-तिकीट सेवा बंद राहणार असल्याचा मेसेज साईटवर झळकत होता. नंतर पुन्हा प्रयत्न करा. तिकिट रद्द करण्यासाठी किंवा नवीन तिकिट काढण्यासाठी कृपया कस्टमर केअर नंबरवर कॉल करा, असा मेसेज साईटवर झळकत होता. १४६४६, ०७५५-६६१०६६१ आणि ०७५५-४०९०६०० किंवा etickets@irctc.co.in क्रमांकावर मेल करा. तब्बल तासभर ही सेवा ठप्प राहली. ही सेवा सध्या सुरू झाली असली तरी आयआरसीटीसीचे नवे खाते तयार करण्याची सुविधा २४ तास बंद राहणार आहे.

नवीन खाते पुढील २४ तास तयार करता येणार नाही

तब्बल तासभर बंद असलेले आयआरसीटीसीची सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू झाली असली तरी प्रवाशांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. संकेत स्थळावर म्हटले आहे की, ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून पुढील २४ तासांपर्यंत म्हणजेच १० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत प्रवाशांना नवीन खाते तयार करता येणार नाही. साईटवरील हा पर्याय २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. नवीन नोंदणीव्यतिरिक्त विद्यमान खात्याचा पासवर्ड बदलण्याचा पर्यायही या काळात उपलब्ध होणार नाही.

तत्काळ तिकिट सेवा ठप्प

आयआरसीटीसीची वेबसाइट आणि अ ॅप या दोन्हीवर परिणाम झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी १० पासून तिकिट बुकिंग सेवा बंद होती. यामुळे तात्काळ तिकिटे बुक करतांना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तात्काळ तिकिटांचे बुकिंग ऑनलाइन अ ॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून प्रवाशांना करता आले नाही. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी आयआरसिटीसीच्या सेवेवर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर आयआरसीटीसी आणि तात्काळ हे कीवर्डही बऱ्याच काळापासून ट्रेंड देखील करत आहेत.

मात्र, आयआरसीटीसीकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एरवी वेबसाइटच्या मेंटेनन्सचे काम रात्री ११ नंतर केले जाते, त्यामुळे इन्स्टंट तिकीट बुक करताना वेबसाइटवरील मेंटेनन्स मेसेज प्रवाशांना समजला नाही. सायबर हल्ल्या झाल्याचा संशय व्यक्त करत तसेच देखभाल दुरुस्तीच्या कारणासाठी वेबसाइटच्या देखभालीची गरज भासली असावी, असा अनेकांचा अंदाज होता. सध्या तिकिट बुकिंग सेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच तिकिट बुकिंग करता येणार आहे.

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर