मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Recruitment News : इरकॉन इंटरनॅशनलमध्ये लाखापेक्षा जास्त पगाराची नोकरी, कुठे कराल अर्ज?

Recruitment News : इरकॉन इंटरनॅशनलमध्ये लाखापेक्षा जास्त पगाराची नोकरी, कुठे कराल अर्ज?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 20, 2024 07:19 PM IST

Ircon International Jobs News : इरकॉन इंटरनॅशनल या सरकारी कंपनीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती निघाली आहे. जाणून घ्या पात्रता, पगार व अन्य माहिती…

Recruitment News
Recruitment News

Ircon International Jobs News : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेशी संबंधित इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या सरकारी कंपनीनं सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२४ ही आहे.

कंपनीनं काढलेल्या परिपत्रकानुसार, या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २८ पदं भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार ircon.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Jio AirFiber: फुकटात जिओ एअरफायबरचं कनेक्शन मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा

पात्रतेचे निकष काय?

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडं स्थापत्य अभियांत्रिकीतील पूर्णवेळ पदवी किमान ७५% गुणांसह असावी किंवा संंबंधित अर्जदारानं एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त प्रतिष्ठित संस्था/विद्यापीठातून समकक्ष पदवी घेतलेली असावी. अर्जदाराचं वय ३० वर्षांपेक्षा कमी असावं.

उमेदवाराला महामार्ग/रेल्वे/पूल (रस्ते/रेल्वे/व्ही-कॉर्प्स) मधील बांधकाम संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा.

निवड झाल्यास पगार किती?

निवड झाल्यास उमेदवाराला ४०,००० ते १,४०,००० रुपयांपर्यंत पगार मिळेल.

७०० गाड्या, ४,००० कोटींचा राजवाडा, ८ प्राइव्हेट जेट अन् बरंच काही! कुबेरालाही लाजवेल अशी संपत्ती एका कुटुंबाकडं

निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांना लेखी चाचणी (CBT) आणि मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. निवडलेल्या उमेदवारांना कंपनीत किमान तीन वर्षे सेवेसाठीचा ३ लाख रुपयांचा बाँड भरून द्यावा लागेल. 

अर्ज शुल्क

सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कापोटी १,००० रुपये भरावे लागतील. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग आणि पेमेंट गेटवे सेवेमध्ये उपलब्ध असलेल्या इतर पद्धती वापरून ऑनलाइन पद्धतीनं अर्जाचं शुल्क भरता येईल. संबंधित भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी इरकॉनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.

WhatsApp channel