मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

May 20, 2024 11:22 AM IST

Ebrahim raisi helicopter crash updates : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर बचाव पथकाने शोधून काढले आहे. या हेलिकॉप्टर अपघातात रईसी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर बचाव पथकाने शोधून काढले आहे. या हेलिकॉप्टर अपघातात रईसी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर बचाव पथकाने शोधून काढले आहे. या हेलिकॉप्टर अपघातात रईसी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. (AP)

Ebrahim raisi helicopter crash updates: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन १७ तास उलटले आहे. बचाव पथकाला त्यांचे हेलिकॉप्टर सापडले आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत रईसी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचा रविवारी अपघात झाला होता. १७ तासांनंतर सोमवारी सकाळी बचावपथकाला त्यांचे अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले.  मात्र, अपघातस्थळी जीविताची कोणतीही चिन्हे आढळली नसल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टर सापडल्यानंतर हेलिकॉप्टरमधील कुणीही जिवंत असेल याची शक्यता नाही असे बचाव पथकाने म्हटले आहे.

दरम्यान, इराणच्या रेड क्रिसेंटचे प्रमुख पिरहुसेन कोलिवंद यांनी देखील या अपघातातून कुणी बचावले असेल याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. इराणची राजधानी तेहरानपासून वायव्येला ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रईसी शेजारी राष्ट्र अझरबैजान येथून एका धरणाचे उद्घाटन करून परत येत होते.

इब्राहिम रईसी यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्रीही उपस्थित

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमती, तबरीझची शुक्रवारची नमाज इमाम मोहम्मद अली अलेहाशेम, वैमानिक, सहपायलट, क्रू चीफ, सुरक्षा प्रमुख, आणि आणखी एक अंगरक्षक होते.

हेलिकॉप्टर कसे कोसळले?

मुसळधार पाऊस, धुके आणि वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. यामुळे या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याणे वैमानिकाला 'हार्ड लँडिंग' करावे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रविवारी या दुर्घटनेच्या वृत्तानंतर इराणच्या लष्कराच्या चीफ ऑफ स्टाफने सर्व लष्कर आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या बचाव पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवले. सोमवारी पहाटे सोशल मीडियावर अनेक दृश्यांमध्ये चमकदार जॅकेट आणि डोक्याची टॉर्च परिधान केलेले बचाव पथक जीपीएस डिव्हाइसच्या साह्याने बर्फवृष्टीत पायी चालत अपघातस्थळाचा शोध घेतांना दिसत होते.

दरम्यान या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर इराणचे परराष्ट्र धोरण आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमावर कोणताही परिमाण होणार नाही असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट केले.

अनेक जागतिक नेत्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि बचावकार्यात मदत करण्याची तयारी दर्शविली. इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, रशिया, तुर्कस्तान आणि युरोपियन युनियन या देशांनी मदतीचा हात पुढे केला. शोध कार्यात मदत करण्यासाठी युरोपियन युनियनने आपली जलद प्रतिसाद मॅपिंग सेवा देखील सक्रिय केली.

'बेल २१२' या हेलिकॉप्टरचा वापर पोलिस वापर, वैद्यकीय वाहतूक, सैन्य वाहतूक, ऊर्जा उद्योग आणि अग्निशमन दलासाठी केला जातो. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीकडे असलेल्या टाइप सर्टिफिकेशन कागदपत्रांनुसार, हे विमान क्रूसह १५ लोकांना घेऊन जाऊ शकते. हे हेलिकॉप्टर प्रथम १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात मूळ यूएच -१ इरोक्विसचे अपग्रेड व्हरजन म्हणून कॅनेडियन सैन्यासाठी तयार करण्यात आले होते.

बचाव पथकाला इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर सापडल्याचे इराणच्या वृत्तसंस्थांनी वृत्त दिले आहे. "रेस्क्यू टीम राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचल्या आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्या शोधात कोणीही जिवंत सापडले नाही," असे इराणच्या प्रेस टीव्हीने ट्विट केले. अशा परिस्थितीत रायसी आणि इतर इराणी अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडण्याची भीती आहे. तुर्कस्तानच्या टीमने रायसीचे हेलिकॉप्टर शोधून काढल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर इराणी अधिकाऱ्यांसह टीम घटनास्थळी पोहोचली. मात्र, रायसीचा शोध अद्याप लागलेला नाही.

वृत्तानुसार, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी, परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दोल्लाहियान, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर आणि अंगरक्षक हे हेलिकॉप्टरमध्ये होते. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत रविवारी एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर रायसी हे इराणच्या सीमेवर परतत होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर वराझकान आणि जोल्फा शहरांदरम्यानच्या डिझमार जंगलात कोसळले.

अमेरिकेला कटाचा संशय  

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टर अपघातावरून अमेरिकेतही खळबळ उडाली आहे. जो बायडन यांनी तातडीची बैठक बोलावली. या अपघातावर अमेरिकन खासदार चक शूमर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अपघातामागे काही षडयंत्र असू शकते, असे आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र, असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. ते म्हणाले की, इराणमध्ये ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले त्या ठिकाणचे हवामान खूपच खराब होते. त्यामुळे प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसत असले तरी अपघाताची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच काही सांगता येईल.

टी-२० वर्ल्डकप २०२४