Iran tehran university girl protest viral video : इराणमध्ये नोव्हेंबर महिन्यात हिजाब सक्तीविरोधात एका तरुणीने तेहरानच्या इस्लामिक आझाद विद्यापीठात कपडे काढून अंतर्वस्त्रांमध्ये फिरतानां आढळून आली होती. या तरुणीचा व्हिडिओ जगात व्हायरल झाला होता. दरम्यान, या तरुणीला तेहरान पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ही तरुणी गायब झाली होती. या तरुणीचे नेमके काय झाले या बाबत सर्व जगाला चिंता लागली होती. दरम्यान, या तरुणीबद्दल आता मोठी अपडेट पुढे आली आहे.
तेहरान येथील इस्लामिक आझाद विद्यापीठात हिजाब सक्ती विरोधात कॉलेजमध्ये अंतर्वस्त्रांमध्ये फिरत होती. या तरुणीवर इराणने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. ती आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे १९७९ च्या इस्लामी क्रांतीच्या काळात महिलांना मान आणि डोके झाकणे बंधनकारक करण्यात आलं होतं.
इराणच्या न्यायव्यवस्थेने या तरुणीवर कारवाई केली नसल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. न्यायपालिकेचे प्रवक्ते असगर जहांगीर यांनी सांगितले की, या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले आहे. यात ती मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर या तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिच्या विरोधात कोणताही कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला हा व्हिडिओ समोर आला होता. ही घटना तेहरानच्या इस्लामिक आझाद विद्यापीठातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यापीठात सुरक्षा दलांनी केलेल्या मारहाणीनंतर निषेध म्हणून महिलेने हे पाऊल उचलले. या महिलेने हिजाब परिधान केला नसल्याचे सुरक्षा दलांना आढळून आले होते. या घटनेत काही महिलाही जखमी झाल्या होत्या.
इराणचे पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. इराणमध्ये एका विद्यार्थिनीला तिच्या विद्यापीठात पोलिसांनी तरुणीने हिजाब घातला नाही म्हणून तिला त्रास दिला. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून तरुणीने तिने कपडे काढले आणि अंतर्वस्त्रांमध्ये विद्यापीठ कॅम्पसमध्ये फिरून हिजाब सक्तीचा निषेध केला. तरुणीचा हा लढा इराणच्या महिलांच्या स्वातंत्र्यलढ्याची आठवण करून देणारा आहे.