Iran president Ebrahim raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी क्रॅश झाले. दरम्यान या दुर्घटनेनंतर रईसी कोणत्या परिस्थितीत आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी सरकारी टीव्हीला सांगितले की, राष्ट्राध्यक्ष व त्यांच्यासोबत काही लोक हेलिकॉप्टरने परत जात होते. खराब हवामान आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. त्यांनी सांगितले की, बचाव पथके घटनास्थळी जात आहेत. मात्र खराब हवामान व धुक्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे.
इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ ही घटना घडल्याचे सरकारी टीव्हीने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रईसी यांच्यासोबत देशाचे अर्थमंत्री अमीराब्दुल्लाहियन, इराणचे पूर्व अजरबैजान प्रांताचे गर्व्हनर व अन्य अधिकारी व अंगरक्षकही प्रवास करत आहेत.हेलिकॉप्टरमध्ये होते. पूर्व अझरबैजान भागात हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्यात आले. एक बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
६३वर्षीय रईसी हे कट्टरपंथी असून त्यांनी इराणच्या न्यायव्यवस्थेचेही नेतृत्व केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे शिष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काही विश्लेषकांनी सांगितले आहे की ८५ वर्षीय खोमेनी यांचे निधन झाल्यास किंवा राजीनामा दिल्यास त्यांची जागा ते घेऊ शकतात.
अहमद वाहिदी यांनी सांगितले की, हा प्रात दुर्गम असल्याने तेथे पोहोचणे कठीण आहे. आम्ही बचाव टीमच्या लँडिंग साइटवर पोहोचण्यासाठी त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी टीव्हीने सांगितले की, बचाव पथके घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र खराब हवामानामुळे मदत व बचाव अभियान प्रभावित झाले आहे. जोरदार वारे व मुसळधार पाऊस तसेच दाट धुके असल्याची माहिती मिळाली आहे. आयआरएनएने या क्षेत्रात जंगल असल्याचे सांगितले जात आहे.
धरणाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते अजरबैजान -
इब्राहिम रईसी रविवार पहाटे अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांच्यासोबत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी अझरबैजानला गेले होते. दोन्ही देशांनी अरास नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. रईसी इराणच्या पूर्वेला असलेल्या अझरबैजान प्रांतात जात होते. रईसी यांनी २०२१ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकली होती.
संबंधित बातम्या