Iran Israel War : इराणची युद्धात उडी; इस्त्रायलवर डागली १५० क्षेपणास्त्रे, देशभर घुमत आहेत सायरनचे आवाज, VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Iran Israel War : इराणची युद्धात उडी; इस्त्रायलवर डागली १५० क्षेपणास्त्रे, देशभर घुमत आहेत सायरनचे आवाज, VIDEO

Iran Israel War : इराणची युद्धात उडी; इस्त्रायलवर डागली १५० क्षेपणास्त्रे, देशभर घुमत आहेत सायरनचे आवाज, VIDEO

Updated Oct 01, 2024 11:43 PM IST

Iran attack on israel : इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण देशात हवाई हल्ल्लायचे सायरन वाजत आहेत. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. इस्त्रायलने इशारा दिला आहे की, इराणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

इराणचा इस्त्रायलवर हल्ला
इराणचा इस्त्रायलवर हल्ला

गेल्या सुमारे एक वर्षापासून सुरू असलेल्या हमास-इस्रायल संघर्षात आज इराणने उडी घेतली आहे. इस्रायलने वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धात सुरुवातीला हमास आणि मागील आठवड्यात हिजबुल्लाह संघटनांच्या म्होरक्यांना लक्ष्य करून या संघटनांचे कंबरडे माडले आहे. इराणचे समर्थन असलेल्या हिसबुल्लाहचा प्रमुख नसरल्ला याला इस्रायलने ठार केल्यानंतर चवताळलेल्या इराणने आज इस्रायलला लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यामुळे तेल अवीव शहरात खळबळ माजली असून संपूर्ण इस्रायलमध्ये आपातकालीन सायरन वाजू लागले आहेत. अनेक इस्रायली नागरिकांनी सुरक्षितस्थली पलायन केले आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडत आहे. दोन्ही देशांमधील प्रचंड तणाव आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी (israel defence forces) याला दुजोरा दिला असून या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायली नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचे म्हटले आहे. आज संध्याकाळी अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने इस्रायलला इशारा दिला होता की, इराण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याची योजना आखत आहे.

इराणने इस्रायलवर १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली असून देशभरात हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आणि बॉम्ब शेल्टरजवळ राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इराणने हल्ला केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इस्रायलने यापूर्वीच दिला आहे. यानंतर इस्रायलही इराणला प्रत्युत्तर देईल, असे मानले जात आहे.

इस्रायलच्या लष्कराने आज (मंगळवारी) लेबनॉनमध्ये जमीनी कारवाई सुरू केली आणि लेबनॉनमधील सुमारे दोन डझन सीमावर्ती शहरे रिकामी करण्याची धमकी दिली. या हल्ल्याव्यतिरिक्त इस्रायलच्या जाफा येथेही गोळीबाराची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याला दहशतवादी हल्ला असे संबोधण्यात आले आहे. तेव अवीववरही रॉकेट डागण्यात आले आहेत. हिजबुल्लाहने ही कारवाई केली होती.  

याशिवाय लेबनॉन आणि इस्रायल सीमेवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले झाले आहेत. इस्रायलकडूनही लेबनॉनवर रॉकेट डागण्यात आले आहेत. इराणच्या ताज्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इस्रायली हद्दीत एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे डागली जात असल्याचे दिसत आहे.

इस्रायलच्या विविध भागात इराणकडून क्षेपणास्त्रे डागताच इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हागरी यांनी देशाला उद्देशून केलेल्या घोषणेत म्हटले आहे की, "प्रिय नागरिकांनो, काही काळापूर्वी इराणकडून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. आपल्याला सतर्क राहण्याची आणि होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे योग्य पालन करण्याची विनंती आहे. "

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर