मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ips officer shiladitya chetia :धक्कादायक! पत्नीचा कर्करोगाने मृत्यू, काही वेळातच IPS अधिकाऱ्याने संपवले जीवन

ips officer shiladitya chetia :धक्कादायक! पत्नीचा कर्करोगाने मृत्यू, काही वेळातच IPS अधिकाऱ्याने संपवले जीवन

Jun 19, 2024 06:56 AM IST

ips officer shiladitya chetia : पत्नीचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचे कळताच आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनीही टोकाचे पाऊल उचलत वीरहातून त्यांचे जीवन संपवलं.

धक्कादायक! पत्नीचा कर्करोगाने मृत्यू, काही वेळातच IPS अधिकाऱ्याने संपवले जीवन
धक्कादायक! पत्नीचा कर्करोगाने मृत्यू, काही वेळातच IPS अधिकाऱ्याने संपवले जीवन

ips officer shiladitya chetia : आसाममधील गृह आणि राजकीय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे. आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळलयार त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या पत्नी या अनेक दिवसांनपासून कर्करोगाच्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान पत्नीचा मृत्यूची माहिती कळताच शिलादित्य चेतिया यांनीही त्यांचं जीवन संपवलं. या घटनेसंदर्भात आसामचे पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी माहिती देताना सांगितलं की, “शिलादित्य चेतिया यांच्या पत्नीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर काही मिनिटात शिलादित्य चेतिया यांनीही आत्महत्या केली. सिंह यांनी या संदर्भात पोस्ट देखील केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, , 'ही घटना दुर्दैवी आहे. आसामचे गृह आणि राजकीय सचिव शिलादित्य चेतिया यांनी आज संध्याकाळी त्यांच जीवन संपवलं. ते २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत असलेल्या पत्नीच्या निधनानंतर काही मिनिटांनी त्यांनी हे पाऊल उचलले. आज डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण आसाम पोलीसांवर शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयसीयूत रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून संपवलं जीवन

पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिली. आयपीएस अधिकारी चेतिया यांनी अतिदक्षता विभागात (आयसीयू) आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, जिथे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. राज्याचे गृह सचिव म्हणून नियुक्तीपूर्वी, चेतीया हे तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) होते. आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

शिलादित्य चेतिया हे २००९ चे आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या पत्नीच्या आजारामुळे ते रजेवर होते. शिलादित्य चेतिया यांच्या मृत्यूच्या घटनेचा तपास पोलीस करणार आहेत, अशी माहिती सांगण्यात येत आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर