iPhone Offers: भारतासह संपूर्ण जगभरात नवीन वर्ष जल्लोषात साजरे केले जात आहे. नव्या वर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात घर, कार, बाईक आणि मोबाईलची खरेदी केली जाते. याच पार्श्वभूमीवर अॅप्पल कंपनीने त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आयफोन १५ च्या खरेदीवर १२ हजारांची सूट दिली आहे. ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी असेल. त्यानंतर ग्राहकांना आयफोन १५ जुन्या किंमतीत खरेदी करावा लागेल.
नव्या वर्षानिमित्त आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. रिटेल चेन कंपनी विजय सेल्सच्या देशभरातील १३० स्टोअर्स आणि आयफोन निर्माता अॅप्पल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आयफोन १५ च्या खरेदीवर १२ हजारांची सूट दिली जात आहे. या सेल सुरु झाला असून येत्या ७ जानेवारीपर्यंत चालेल.
दरम्यान, १२ सप्टेंबर २०२३ मध्ये आयफोन १५ ला भारतीय बाजारात लॉन्च केले होते. यानंतर २२ सप्टेंबरपासून आयफोन १५ च्या विक्रीला सुरुवात झाली होती. आयफोनच्या १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. तसेच २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ८९ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय, ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे.
विजय सेल्समध्ये आयफोन १५ च्या बेस व्हेरिएंटची किंमत ७० हजार ९९० रुपये ठेवण्यात आली. परंतु, इतर ऑफर्समुळे आयफोन १५ च्या खरेदीवर ग्राहकांना अतिरिक्त डिस्काऊंट मिळत आहे. एचडीएफसीच्या बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना इन्स्टंट ४ हजारांचे डिस्काऊंट दिले जात आहे. अशाप्रकारे ग्राहकांना आयफोन १५ च्या खरेदीवर १२००० हजारांची बचत करता येणार आहे.