Indian Oil Corporation Limited Recruitment 2024: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयओसीएल येथे कनिष्ठ अभियंता सहाय्यक आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार iocl.com येथे आयओसीएलच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरती मोहिमेमुळे संस्थेतील ४७६ पदे भरली जाणार आहेत. नोंदणी प्रक्रिया २२ जुलै २०२४ रोजी सुरू झाली असून २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा द्यावी लागणार आहे, जी सप्टेंबरमध्ये होईल. या परीक्षेचा निकाल ऑक्टोबर २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत जारी केला जाईल.
निवड पद्धतीमध्ये संगणक आधारित चाचणी (सीबीटी) आणि कौशल्य / प्रवीणता / शारीरिक चाचणी (एसपीपीटी) यांचा समावेश असेल. एसपीपीटी पात्रता स्वरूपाची असेल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये प्रत्येकी १ गुणांचे १०० प्रश्न असलेले एक ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असेल आणि सीबीटी पूर्ण करण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. एका शाखेसाठी सीबीटी एका दिवसात एक/दोन/तीन सत्रांमध्ये आयोजित केली जाऊ शकते. एसपीपीटीसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला संगणक आधारित चाचणीत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी (एनसीएल) उमेदवारांना केवळ ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क (नॉन-रिफंडेबल) म्हणून ३००/- रुपये भरणे आवश्यक आहे. या नोकरी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
संबंधित बातम्या