मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan Mosquito issue : पुरामुळे पाकिस्तानात डासांचा उपद्रव; भारताकडून खरेदी करणार तब्बल ६२ लाख मच्छरदाण्या
पाकिस्तान पुर
पाकिस्तान पुर

Pakistan Mosquito issue : पुरामुळे पाकिस्तानात डासांचा उपद्रव; भारताकडून खरेदी करणार तब्बल ६२ लाख मच्छरदाण्या

12 October 2022, 12:14 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pakistan will buy Mosquito Nets from India : पाकिस्तानात एकीकडे पुरामुळे हाहाकार माजला असताना आता या पुरामुळे आता अनेक संकटांना पाकिस्तानला सामोरे जावे लगत आहे. पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदावास वाढली असून याचा नागरिकांना त्रास होत आहे. या मुळे रोगराई पसरणाची देखील भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे पाकिस्तान भारताकडून मच्छरदाण्या विकत घेत आहे.

लाहोर : पाकिस्तानच्या सरकारने मंगळवारी सरकारच्या आरोग्य विभागाला भारता कडून तब्बल ६२ लाख मच्छरदाण्या विकत घेण्यास मंजूरी दिली आहे. पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे अनेक नवी संकटे तेथील नगरिकांपुढे येत आहे. पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदावास वाढली आहे. यामुळे मोठी रोगराई पासरण्याच्या धोका व्यक्त केला जात आहे. आपल्या नागरिकांचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी पाकिस्तान भारताकडून या मच्छरदाण्या विकत घेणार आहे. पुरामुळे यावर्षी पाकिस्तानात १ हजार ६०० हून अधिक नगरिकांचा मृत्यू झाला आहे. द न्यूज इंटरनेशनलने दिलेल्या अहवाला नुसार पाकिस्तानातील ३२ पूरग्रस्त जिल्ह्यात मलेरिया वेगाने पसरतोय. येथील हजारो लहान मुले डास चावल्यामुळे आजारी पडत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुर प्रभावित परिसरात मलेरिया वाढण्याची शक्यता आहे. यामुले देशाच्या आरोग्य मंत्र्यांना गेल्या महिन्यात भारताकडून मच्छरदाण्या विकत घेण्यासाठी परवानगी घेण्यात आली. त्यांनी सांगितले की, ग्लोबल फंड तसेच जगीतिक आरोग्य संघटनेकडून पाकिस्तान मधील पूरग्रस्त परिसरात मच्छरदाण्या विकत घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितले की लवकरात लवकर या मच्छरदाण्या घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत वाघा सीमा मार्गाने पाकिस्तानात पोहचतील.

गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने पुर आल्यानंतर रोगराई पसरण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस यांनी म्हटले होते की, आरोग्य केंद्रात पाणी भरले आहे. तर काही नागरिक त्यांच्या घरापासून दूर गेले आहेत. त्यांनी सांगितले की, सरकार दूषित पाण्यापासून होणारे आजार कमी करण्यासाठी सुरक्षित पेयजल आणि टॉयलेटची व्यवस्था केली जात आहे. ओसीएचए ने सांगितले की, लोकांची मदत करण्यासाठी लवकरात लवकर ८१.६ कोटी अमेरिकी डॉलरची मागणी पाकिस्तानने केली आहे.

 

विभाग