मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan : भर सभेत भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचा व्हिडिओ लावून इम्रान खान म्हणाले, याला म्हणतात स्वतंत्र देश

Imran Khan : भर सभेत भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचा व्हिडिओ लावून इम्रान खान म्हणाले, याला म्हणतात स्वतंत्र देश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 15, 2022 03:12 PM IST

इमरान खान यांनी आता राज ठाकरे यांची स्टाईल आंगीकारली आहे. भर सभेत लावरे तो व्हिडिओ म्हणत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचा व्हिडिओ भर सभेत लावला. यावेळी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करत पाकिस्तानच्या सरकारवर टीकेची जोड उठवली.

इमरान खान
इमरान खान

लाहोर : इमरान खान यांनी पाकिस्तान येथे दोन दिवसांपूर्वी सभा घेत एक व्हिडिओ दाखवला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा हा व्हिडिओ आहे. भर सभेत त्यांनी हा व्हिडिओ दाखवत भारताच्या परराष्ट्र नितीचे कौतुक केले. इमरान खान म्हणाले, यूक्रेन युद्धामुळे सर्वांनी रशियावर निर्बंध लावले. असे असतांनाही हे सर्व निर्बंध झुगारून भारत रशियाकडून तेल विकत घेत आहे. कारण भारतीय जनतेच्या ते हिताचे आहे. पाकिस्तानसोबत स्वतंत्र झालेला भारत आज भारतीय जनतेच्या हितानुसार कठोर निर्णय घेत आहे.

पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री इमरान खान यांनी पुन्हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. इमरान खान हे लाहोर येथील एका रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी भारताचे परराष्ट मंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ लावला. यावेळी त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाचे उदाहरण देत भारताचे कौतुक केले. इमरान खान पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झालयानिमित्त शनिवारी त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलील संबोधित करताना ते बोलत होते. इमरान खान म्हणाले, अमेरिकेचे सर्व निर्बंध झुगारून भारत हा रशियाकडून तेल विकत घेत आहे. आंतरराष्ट्रीय दबाव असतांनाही त्यांनी त्याला बळी न पडता, आपल्या धोरणारवर कायम राहील आहे हे कौतुक करण्यासारखे आहे.

या रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी जय शंकर यांचा व्हिडिओ लावला. या नंतर इमरान खान म्हणाले, मी तुम्हाला सांगतो की, भारताच्या विदेश मंत्र्यांनी काय सांगितले. अमेरिकेने भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले की, रशिया कडून तेल खरेदी करू नका. मात्र, एस. जयशंकर यांनी अमेरिकेला चोख उत्तर दिले. जय शंकर म्हणाले, तुम्ही कोण आहात आमच्यावर दबाव टाकणारे ? जयशंकर म्हणाले, यूरोपातील सर्व देश रशियाकडून नैसर्गिक गॅस घेत असताना ते त्यांच्या देशांची हीते जोपासतात. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या गरजा नुसार रशिया कडून तेल विकत घेऊ. इमराम खान म्हणाले, हा खरा स्वतंत्र देश आहे.

रशियाकडून तेल विकत घेण्याचे केले कौतुक

रॅलील संबोधित करताना इमरान खान यांनी म्हटले की, 'भारत रशियाकडून तेल विकत घेत आहे. कारण हे भारतीय जनतेच्या हिताचे आहे. जर पाकिस्तान सोबत स्वतंत्र झालेला भारत जर स्वतंत्र परराष्ट्र धोरण अवलंबत असेल आणि आपल्या नागरिकांसाठी कठोर निर्णय घेत असेल तयार प्रधानमंत्री शहबाज शरीफ सरकार का आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकतात?

 

IPL_Entry_Point

विभाग