Inter state sex racket : अरुणाचल प्रदेश पोलिसांनी एका आंतरराज्यीय वेश्वावृत्ती टोळीचा पर्दाफाश करत १० ते १५ वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. इटानगर पोलीस अधीक्षक रोहित राजबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या अल्पवयीन मुलींना दोन बहिणींनी शेजारचे राज्य आसाममधून तस्करी करून आणले होते. त्यांनी सांगितले की, आरोपी बहिणी इटानगरमध्ये एक ब्यूटी पार्लर चालवत होत्या.
पोलिसांनी सांगितले की, चिंपू येथे अल्पवयीन मुलींकडून वेश्वा व्यवसाय सुरू असल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ४ मे रोजी तेची रीना आणि जामलो तागुंग यांच्या घरी छापा मारला होता. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. दोन महिला आपल्या घरातूनच सेक्स रॅकेट चालवत होत्या.
पोलिसांनी सांगितले की, चौकशीत अल्पवयीन मुलींनी सांगितले की, पुष्पांजली मिली आणि पूर्णिमा मिली नावाच्या दोन बहिणींनी त्यांना धेमाजी येथून इटानगरला आणले होते. येथे आणल्यानंतर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात आला.
सिंह यांनी सांगितले की, याबाबत बाल कल्याण समितीला कळवले आहे. त्याच्या तक्रारीच्या आधारावर इटानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून याचा तपास केला जात आहे. त्याचबरोबर तपासात समोर आले आहे की, धेमाजीमधून तस्करी करून आणलेल्या आणखी दोन अल्पवयीन मुली पुष्पांजलीच्या ताब्यात आहेत.
पोलिसांनी पुन्हा छापेमारी करून या मुलींचीही सुटका केली आहे. आरोपी महिलांना अटक करण्यात आली असून मुलींना आश्रयगृहात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या टोळीतील सात लोकांना अटक केली असून आठ गिऱ्हाईकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या आठ पैकी तीन सरकारी अधिकारी आहेत.
एका प्रकरणाच्या निकालात कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta high court) स्पष्ट केले की, महिलांना 'स्वीटी' आणि 'बेबी' संबोधणे (sweetie and baby sexual comment) नेहमी चुकीचं असू शकत नाही. कोलकाता हायकोर्टाने म्हटले की, काही सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी ही नावे प्रचलित आहेत. या शब्दांचा वापर नेहमी सेक्शुअल सेंटीमेंट उघड करत नाही.