पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या प्रियांका गांधी किती कोटींच्या मालक? कोणत्या म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या प्रियांका गांधी किती कोटींच्या मालक? कोणत्या म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक? वाचा

पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या प्रियांका गांधी किती कोटींच्या मालक? कोणत्या म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक? वाचा

Published Oct 25, 2024 06:41 PM IST

Priyanka Gandhi Property : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारंसघातून पोटनिवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.

पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या प्रियांका गांधी किती कोटींच्या मालक? कोणत्या म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक? वाचा
पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या प्रियांका गांधी किती कोटींच्या मालक? कोणत्या म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक? वाचा

Priyanka Gandhi declares assets : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या प्रियांका गांधी यांच्याकडं असलेल्या संपत्तीचा आकडाही पहिल्यांदाच समोर आला आहे. त्यानुसार, प्रियांका गांधी या कोट्यधीश आहेत.

प्रियांका गांधी यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, प्रियांका गांधी यांच्याकडं १२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यातील ४.२४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर ७.७४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

प्रियांका यांनी १.०९ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली असून खरेदीनंतर बांधकामावर ५.०५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांना २.१० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता वारसाहक्कानं मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर १५ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज आहे.

प्रियांका गांधी यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचं उत्पन्न ४६.३९ लाख रुपये जाहीर केलं आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये त्यांनी ४७.२१ लाख रुपये कमावले. ३० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्याकडं ५२ हजार रुपयांची रोकड होती.

 प्रियांका गांधी प्रतिज्ञापत्र
प्रियांका गांधी प्रतिज्ञापत्र

शेअर्स, म्युच्युअल फंड

प्रियांका गांधी यांची म्युच्युअल फंडात २.२४ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांनी फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप-ग्रोथच फंडात १३,२०० युनिट्स खरेदी केले आहेत. एसबीआयमधील पीपीएफ खात्यातही त्यांचे १७.३८ लाख रुपये आहेत. तर, बँक खात्यात सुमारे ३.६ लाख रुपये आहेत.

प्रियांका गांधी यांची शेअरमध्ये काहीच गुंतवणूक नाही, मात्र त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची उषा मार्टिन, इन्फोसिस, टाटा पॉवर, एनआयआयटी, रेल विकास निगम आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक आहे.

कार व सोने-चांदी

प्रियांका गांधी यांच्याकडं ८ लाख रुपये किमतीची होंडा सीआरव्ही कार आहे. ही कार त्यांना त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भेट दिली आहे. त्यांच्याकडं १.१५ कोटी रुपयांचं सोनं आणि २९ लाख रुपये किमतीची चांदी आहे.

प्रियांका गांधी व त्यांचे भाऊ राहुल यांच्या दोघांच्या नावे दिल्लीतील सुलतानपूर महरौली गावात २.१ कोटी रुपये किमतीचे दोन भूखंड आहेत. ही शेतजमीन आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला इथं त्यांचं ५.६३ कोटी रुपये किंमतीचं घर आहे.

रॉबर्ट वाड्रा यांची संपत्ती किती?

प्रियांका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची संपत्ती ६५.५ कोटी रुपये आहे. यामध्ये ३७.९ कोटी रुपयांच्या जंगम आणि २७.६४ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

वायनाडमध्ये २३ नोव्हेंबरला मतदान

प्रियांका गांधी यांचे बंधू राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त केलेल्या केरळमधील वायनाड मतदारसंघासाठी १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रियांका यांच्यासोबत त्यांची आई सोनिया गांधी, भाऊ आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर