Viral News : वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात निघाला किडा! प्रवासी भडकले; रेल्वेनंही केला खुलासा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात निघाला किडा! प्रवासी भडकले; रेल्वेनंही केला खुलासा

Viral News : वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात निघाला किडा! प्रवासी भडकले; रेल्वेनंही केला खुलासा

Nov 17, 2024 02:14 PM IST

vande bharat food Viral news : तिरुनेलवेलीहून चेन्नईला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला जेवणात अळी आढळली. या तक्रारीनंतर रेल्वेने तात्काळ जेवणाची तपासणी करत जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात निघाला किडा! प्रवासी भडकले; रेल्वेनंही केला खुलासा
वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणात निघाला किडा! प्रवासी भडकले; रेल्वेनंही केला खुलासा

vande bharat food Viral news : वंदे भारत एक्सप्रेस भारातील वेगवान आणि आरामदाई प्रवासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या गडीबद्दल अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येऊ लागल्या आहेत. विशेष करून या गाडीतील जेवणाबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.  नुकतीच एक घटना उघडकीस आली आहे.  या घटनेमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

वंदे भारत ट्रेनमधील प्रवासादरम्यान एका प्रवाशाला त्याला मिलेलेल्या जेवणातील सांभारात असं काही सापडलं की त्याला राग आला. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या  व्हिडिओमध्ये एका  अॅल्युमिनियमच्या कंटेनरमध्ये सर्व्ह केलेल्या सांभारात एक किडा तरंगत   असल्याचं दिसत आहे. तिरुनेलवेलीहून चेन्नईला जाणाऱ्या वंदे भारतच्या इतर अनेक प्रवाशांनीही ट्रेनमधील सुविधा चांगल्या असल्या तरी जेवण समाधानकारक नसल्याची तक्रार केली आहे.

काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. 'ट्रेनमधील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत काय कारवाई केली जात आहे,' असा सवाल त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केला आहे. प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 

रेल्वेने घेतली तक्रारीची दखल 

या तक्रारीला रेल्वेनेही प्रतिसाद दिला आहे. रेल्वेच्या वतीने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात आली आहे.  डिंडीगुल स्थानकातील तपासकर्त्याकडे फूड पॅकेज सुपूर्द करण्यात आले. अन्नाच्या पाकिटाला किडा चिकटल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गाडीत जेवण देणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरला रेल्वेने  ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जेवणाचा दर्जा आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर