बोटीवर पार्टी करायला गेल्या, पण लाइफ जॅकेट घालण्यास नकार दिला! पुढं व्हायचं तेच झालं!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बोटीवर पार्टी करायला गेल्या, पण लाइफ जॅकेट घालण्यास नकार दिला! पुढं व्हायचं तेच झालं!

बोटीवर पार्टी करायला गेल्या, पण लाइफ जॅकेट घालण्यास नकार दिला! पुढं व्हायचं तेच झालं!

Updated Oct 30, 2024 04:26 PM IST

two Influencers drowned during yacht party बाझीलमध्ये दोन प्रसिद्ध इंफ्लुएंसरचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला, ज्यांनी लाइफ जॅकेट घालण्यास नका दिला.

बाझीलमध्ये दोन प्रसिद्ध इंफ्लुएंसरचा पाण्यात बुडल्याने मृत्यू
बाझीलमध्ये दोन प्रसिद्ध इंफ्लुएंसरचा पाण्यात बुडल्याने मृत्यू

Brazil Influencer Drowned During Yacht Party: दोन प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल आणि प्रसिद्ध इंफ्लुएंसर अलाइन तामारा मोरेरा डी अमोरिम आणि बीट्रिझ टावरेस दा सिल्वा फारिया यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. स्पीडबोटीतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. समुद्रात लाट आल्याने स्पीड बोट उलटली. पाण्यात जाताना दोन्ही मॉडेल्सनी लाईफ जॅकेट घालण्यास नकार दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲलाइन तमारा मोरेरा डी अमोरिम ३७ वर्षांची होती आणि बीट्रिज टावरेस दा सिल्वा फारिया २७ वर्षांची होती, ती तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जात होती. ब्राझीलमधील डेव्हिल्स थ्रोट किनारपट्टीवर त्यांची बोट उलटली. महत्त्वाचे म्हणजे, महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती. आता याप्रकरणी पोलिसांचे जबाब समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बोट ओव्हरलोड होती. त्यांनी सेल्फीचे कारण देत लाइफ जॅकेट घालण्यास नकार दिला. यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनाग्रस्त बोटीची क्षमता पाच प्रवाशांची होती. मात्र, या बोटीतून सहा जण प्रवास करीत होते. बोट आधीच ओव्हरलोड होती, त्यात समुद्रात आलेल्या लाटेवर आदळली. त्यानंतर बोट हळूहळू पाण्यात बुडू लागली. कॅप्टनने सांगितले की, त्यांनी सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, फक्त दोन जणांना वाचवण्यात त्यांना अपयश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲलाइन एका मुलाची आई होती. तिला पोहता येत नव्हते. तिने तिचे शेवटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, जेव्हा ती बिकिनी परिधान करून बोटीवर बसली होती. या घटनेची माहिती अशी की, अनेक प्रसिद्ध इंफ्लुएंसर बोटीवर पार्टी करण्यासाठी जमले होती. त्यांनी संपूर्ण दिवस फिरण्यात आणि रात्र मद्यपान करण्यात घालवला. नंतर किनाऱ्यावर परतण्यासाठी त्यांनी दोन गट केले. यातील एक गट पाण्यात बुडाला. व्हेनेसा या प्रवाशाने सांगितले की, लाइफ जॅकेट घालून आणि खडकाला चिकटून राहिल्याने ती कशीतरी वाचली. दुसऱ्या प्रवासी कॅमिलाने सांगितले की, तिने लाइफ जॅकेट हातात धरले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर