Viral News: बंगळुरूमध्ये एका दहा वर्षाच्या मुलाने रस्त्याने जाणाऱ्या तरुणीसोहत असे काही कृत्य केले की, ते पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. संबंधित तरुणीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तसेच तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
पीडित तरुणीने सांगितले आहे की, ती लेआउटमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. तितक्यात १० वर्षाचा मुलगा तिच्याजवळ येतो आणि तिचा विनयभंग करतो. मुलाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर मुलीने आणखी एक व्हिडिओ बनवून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलाने तरुणीचा विनयभंग केला, यावर सुरुवातीला कोणीही विश्वास ठेवला नाही. परंतु, तरुणीने व्हिडिओ दाखवल्यानंतर सर्वांची बोलती बंद झाली, असेही तिने म्हटले आहे.
तरुणीने सांगितले की, ती रस्त्यावरून चालत असताना सायकलवरून जाणारा एक मुलगा तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या छातीला हात लावला आणि पळून जाऊ लागला. परंतु, तरुणीने त्याला पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर आजूबाजुला असलेल्या लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. तरुणीने असेही सांगितले आहे की, तिने संबंधित मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. कारण तो अल्पवयीन आहे आणि त्याला भविष्य उध्वस्त करायचे नाही.
आरोपी मुलगा १० वर्षांचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीडित मुलीच्या जवळून जात असताना तो सायकलवर काही स्टंट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुलाचे म्हणणे आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, तरुणीला एफआयआर नोंदवायचा नाही, कारण यामुळे अल्पवयीन मुलाचे भविष्य धोक्यात येईल. मात्र, तरीही आम्ही संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत.
पाण्याच्या टाकीवर स्टंट करतानाचा काही तरुणांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने या स्टंटचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण पाण्याच्या टाकीवर स्टंट करताना दिसत आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडिओ शहरापासून ग्रामीण भागातील लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहाचल्यानंतर त्यांनी व्हायरल व्हिडिओची चौकशी केली जाणार असून संबंधित तरुणांविरोधातआवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.