भारतातील ‘इंद्री’ व्हिस्कीची टेस्ट जगात भारी; ३ वर्षात पटकावलेत १४ पुरस्कार, जाणून घ्या गुणवत्तेची संपूर्ण कहाणी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतातील ‘इंद्री’ व्हिस्कीची टेस्ट जगात भारी; ३ वर्षात पटकावलेत १४ पुरस्कार, जाणून घ्या गुणवत्तेची संपूर्ण कहाणी

भारतातील ‘इंद्री’ व्हिस्कीची टेस्ट जगात भारी; ३ वर्षात पटकावलेत १४ पुरस्कार, जाणून घ्या गुणवत्तेची संपूर्ण कहाणी

Jan 03, 2025 02:15 PM IST

Indri Whiskey : इंद्री हरियाणा राज्यातील पिकाडिली डिस्टिलरीजचा घरगुती सिंगल माल्ट ब्रँड आहे. इंद्रीने पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम व्हिस्की होण्याचा गौरव मिळवला आहे.

‘इंद्री’ व्हिस्की
‘इंद्री’ व्हिस्की

Indri won world best whiskey award : भारतात उत्पादित होणारी अशी एक व्हिस्की आहे जिला जगातील बेस्ट व्हिस्कीचा अवार्ड मिळाला आहे. दारूचे उत्पादन आणि निर्मितीमध्ये पाश्चिमात्य देशाचा प्रभाव राहिला असताना जगातील सर्वोत्तम असलेला हा ब्रँड पूर्णपणे भारतीय आहे. भारतात बनलेल्या या व्हिस्कीने जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. ही व्हिस्की दुसरी कोणती नसून इंद्री आहे. इंद्री (Indri Whiskey) हरियाणा राज्यातील पिकाडिली डिस्टिलरीजचा घरगुती सिंगल माल्ट ब्रँड आहे. इंद्रीने पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम व्हिस्की होण्याचा गौरव मिळवला आहे. 

इंद्री ट्रिनीने अमेरिकेतील प्रसिद्ध एल्को-बेव प्लेटफॉर्म, वाइनपेयरकडून दिला जाणारा बेस्ट ‘न्यू वर्ल्ड’ व्हिस्कीचा पुरस्कार जिंकला आहे. याआधी इंद्रीच्या दिवाळी कलेक्टर एडिशनला २०२३ मध्ये जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की स्पर्धेत डबल गोल्ड बेस्ट अवार्ड मिळाला होता. या स्पर्धेत प्रत्येक वर्षी जगभरातील व्हिस्कीच्या १०० हून अधिक कंपन्या सहभाग घेत असतात.


इंद्रीला मिळालेला हा सन्मान भारतासह परदेशी बाजारात गतीने वाढत असलेल्या भारतीय सिंगल माल्ट ब्रँडमध्ये मजबूती प्रदान करतो. इंद्री या प्रतिष्ठित यादीत सामील असलेला एकमेव भारतीय ब्रँड आहे. २०२१ मध्ये लाँच झाल्यापासून इंद्री-ट्रिनी लोकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. या व्हिस्कीची वैशिष्ट्ये आहे की, ही लाँच होऊन आता केवळ दोनच वर्षे झाली आहेत आणि १४ हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. पिकाडिली डिस्टिलरीज नावाच्या कंपनीने २०२१ मध्ये हरियाणा येथे हा ब्रँड लाँच केला होता.

इंद्री ट्रिनी बनली ‘न्यू वर्ल्ड व्हिस्की’ -
गेल्या १२ महिन्याच्या दरम्यान ग्राहकांची पसंद लक्षात घेऊन जगभरातील शेकडो व्हिस्की ब्रँडची टेस्‍ट घेतली गेली. या टेस्‍टच्या आधारावर वाइनपेयर व्हिस्की प्रत्येक श्रेणीत सर्वोत्तम ठरली. अंतिम रँकिंग तयार करताना व्हिस्कीच्या किंमतीच्या आधारावर त्याची टेस्ट, बॅलेंस, डेप्थ आणि कॉम्पलेक्सिटी विचारात घेतली गेली. या आधारावर हा प्लेटफॉर्म प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला जगातील सर्वश्रेष्ठ व्हिस्कीची य़ादी तयार करत असतो. या वर्षी या यादीत इंद्री ट्रिनीला सर्वश्रेष्ठ ‘न्यू वर्ल्ड’ व्हिस्की म्हणून सन्मानित करण्यात आले. 

भारतातील पहिली ट्रिपल-कास्क सिंगल माल्ट -
इंद्री-ट्रिनी भारतातील पहिली ट्रिपल-कास्क सिंगल माल्ट व्हिस्की आहे. याचे उत्पादन हरियाणातील इंद्री गावात एका डिस्टिलरीमध्ये केले जाते. ‘ट्रिनी’ नाव त्या तीन प्रतिष्ठित कास्कच्या तिकडीच्या नावावर ठेवले आहे, ज्यामध्ये व्हिस्कीला मॅच्योर केले जाते. हे तीन कास्क इन-एक्स-बोर्बोन, एक्स-फ़्रेंच वाइन आणि पीएक्स शेरी आहे. ट्रिपल कास्क एक उत्कृष्ट टेस्ट प्रोफाइल प्रदान करते, जे केरेमेलाइज्ड पायनापल, व्हेनिला, ब्लॅक टी, मणुके, मध आणि गोड फळांच्या स्वादचे प्लेवर देतात. हे विशेष करून राजस्थानातील ज्यारीचा वापर करून हे तयार केले जाते. पिकाडिली डिस्टिलरीजचे संस्थापक, सिद्धार्थ शर्मा म्हणतात की, ही या क्षेत्रातील प्राचीन परंपरांना आमच्याकडून खास खास श्रद्धांजली आहे.


सिद्धार्थ शर्मा यांनी म्हटले की, भारतीय व्हिस्की उद्योग जगाच्या नकाशावर आपली छाप सोडत आहे. बदलत्या या जमान्यात अव्वल ठरल्यामुळे इंद्रीला अभिमान आहे. जगभरातील ग्राहक व टीकाकारांच्या दरम्यान भारतीय सिंगल माल्ट आणि इंद्रीची वाढती लोकप्रियता अनेक अर्थाने खास आहे. वाइनपेयरकडून प्राप्त हा सन्मान आमच्यासाठी खूपच प्रेरणादायक आहे. एकमेव भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीच्या रुपात जागतिक स्तरावर हा बहुमान मिळणे खूपच गौरवास्पद आहे. हा पुरस्कार गुणवत्तापूर्ण व्हिस्की तयार करण्याचा आमचा संकल्प आणखी मजबूत करतो. आमच्या या प्रयत्नामुळे इंद्री आज ग्राहकांची पहिली पसंद बनली आहे. 

ही व्हिस्की भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या किंमतीत विकली जाते. इंद्री सिंगल मॉल्ट इंडियन व्हिस्की जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये खरेदी केली तर ती तुम्हाला ३१०० रुपयांच्या किमतीत मिळेल. तर जर तुम्ही ही महाराष्ट्रात खेरदी करणार असाल तर यासाठी तुम्हाला ५१०० रुपये मोजावे लागतील. सध्या ही व्हिस्की देशातील १९ राज्यात आणि जगभरातील १७ देशांमध्ये उपलब्ध आहे. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर