Indore Viral Video : मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहरात उपचारासाठी डॉक्टरकडे आलेल्या एका रुग्णाचा उपचार सुरू करण्यापूर्वीच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही थरारक घटना रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
परदेशीपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज द्विवेदी यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्रीची आहे. एका तरुण छातीत दुखत असल्याने रुग्णालयात गेला होता. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईक त्याला खासगी रुग्णालयातही घेऊन गेले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
ही घटना इंदूरमधील एका रुग्णालयातील आहे. येथील घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, डॉक्टरकडे आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तेथे उपस्थित लोकांना काही समजण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नावसोनू मतकर होते. ३१ वर्षीय सून इंदूर येथे रहात होता व रिक्षा चालवण्याचे काम करत होता. सोनूला अस्वस्थ वाटू लागल्याने तो डॉक्टरकडे गेला होता. त्याच्याजवळ डॉक्टर तसेच एक नर्सही दिसत आहे. यावेळी रुग्णाला डॉक्टर तपासात होते आणि त्याला उपचार देत होते. पण त्यानंतर हा रुग्ण अचानक बेशुद्ध पडला. यानंतर त्याला उठवेपर्यंत आणि काय होतंय हे कळेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला तत्काळ दुसऱ्या एका मोठ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र खूप उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
रात्रीच्या वेळी सोनूच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तो स्वत:च रिक्षा चालवून परदेशीपुरा क्षेत्रातील दयानंद रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, घटनेचा तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, तरुणाला कार्डिअक अरेस्ट आला होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.